Tanaji Sawant | दोन नंबरचा धंदा पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांकडून पिंपरी चिंचवड पोलिसांची खरडपट्टी (व्हिडिओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Tanaji Sawant | पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये ड्रग्स माफियांचा (Sasoon Hospital Drug Racket) तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये गॅस माफियांचा गोरखधंदा सुरु आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये गॅस रिफिलिंग करताना स्फोट झाला. ही घटना रविवारी रात्री घडली. हीच घटना सकाळच्या सुमारास घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. हा स्फोट तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या जेएसपीएम संस्थेच्या ब्लॉसम शाळेजवळ झाल्याने त्यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांची (Pimpri Chinchwad Police) चांगलीच खरडपट्टी केली.

टँकरमधून गॅस चोरी करताना 9 टाक्यांचा स्फोट झाला. तीन स्कूल बसेस जळून खाक झाल्या. या घटनेमुळे अख्ख पिंपरी चिंचवड शहर हादरून गेलं, स्थानिक नागरिकांनी भीतीपोटी घर सोडून बाहेर पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभर पाण्याचा फवारा मारुन ही आग नियंत्रणात आली. या भीषण आगीमागे गॅस चोरीचा गोरखधंदा कारणीभूत असल्याचे समोर आल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या घटनेला पोलिसच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

दोन नंबरचा धंदा पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू

गॅस माफियांच्या हा हैदोस ससूनमधील ड्रग्स माफियांसारखाच आहे असं म्हणत या काळ्याबाजाराला अन् त्यामुळे लागलेल्या भीषण आगीला पिंपरी चिंचवड पोलिसच जबाबदार आहेत, असा थेट आरोप तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला. जेएसपीएम ही संस्था सावंत यांची आहे. याच संस्थेच्या ब्लॉसम शाळेजवळच्या मोकळ्या जागेत हा गोरखधंदा सुरु होता. त्यामुळे सावंत यांनी भेट देऊन हा दोन नंबरचा धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदेंची (ACP Sanjay Shinde) आरोग्यमंत्र्यांनी चांगलीच खरडपट्टी केली.

पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची तंबी

भीषण आगीच्या घटनेनंतर तानाजी सावंत पोलिसांवर चांगलेच संतापले.
तीन ते चार पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित (Suspended) करण्याची तंबी त्यांनी दिली.
यामुळे पिंपरी- चिंचवड पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. पुण्यातील ससूनमधून ड्रग्स माफिया चालते त्याच पद्धतीने पिंपरी- चिंचवडच्या ताथवडे भागात गॅस माफिया चालतो का? असा सवाल सावंत यांनी पोलिसांना विचारला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करुन संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची 24 तासात बदली करा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यावेळी पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी होते, त्यांना देखील तानाजी सावंत यांनी चांगलेच झापले.

…तर मोठा अनर्थ घडला असता

गॅसच्या टाकीला आग लागल्याने मोठे स्फोट झाले. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
झाले होते. ज्या परिसरात ही घटना घडली तिथं स्कूल, कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हॉस्टेलही आहेत.
ही घटना दिवसा घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
जिथे ही घटना घडली त्याच्या बाजूच्या सोसायटीमधील नागरिकांची पळापळ झाली.
स्फोटाचा आवाज ऐकून नागरिक रस्त्यावर आल्याने मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

वाकड पोलिसांकडून तिघांना अटक

गॅस चोरीच्या काळाबाजारातून भीषण आग लागल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
जागा मालक, चोरीच्या गॅसची विक्री करणारा अन् सिलिंडरची अवैद्यरित्या वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा
समावेश आहे. टँकर चालक मात्र अद्याप फरार आहे. एकामागोमाग एक नऊ स्फोट झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील
गॅस चोरीचा गोरखधंदा चव्हाट्यावर आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kalpana Giri Murder Case | काँग्रेसच्या महिला पदाधिकारी कल्पना गिरी हत्याकांडातील दोघांना जन्मठेप, चौघांना ३ वर्षांची सक्त मजुरी; साडेनऊ वर्ष चालला खटला