Pimpri Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 198 नवीन रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad City) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्ण (Pimpri Coronavirus ) संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 198 नवीन रुग्ण आढळून (Pimpri Coronavirus ) आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 198 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 68 हजार 829 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 63 हजार 348 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 349 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरातील 01 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4392 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.26) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 4339 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 13 लाख 78 हजार 951 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : pimpri chinchwad coronavirus news updates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earn Money | कमाईची गोष्ट ! दूध, तूप, लोणी विकून महिन्याला होऊ शकतं 3 लाखाचं ‘इन्कम’, ‘ही’ कंपनी देतेय संधी; जाणून घ्या

Gold Price Today | सोनं खरेदीची हीच सुवर्णसंधी ! आज पुन्हा सोन्याचा दर घसरला; जाणून घ्या

Anil Deshmukh Case | अखेर राज्य सरकार सीबीआयला देणार संबंधित आवश्यक कागदपत्रे