Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : नवजात बाळांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश; पुण्यातील एका सुप्रसिद्ध हॉस्पिटल मधील नर्सचा समावेश (Video)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी (Wakad Police) नवजात बाळांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.12) दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास जगताप डेअरी (Jagtap Dairy) येथे करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपी महिला सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अंमलदार वंदु गिरे यांना माहिती मिळाली की, काही महिला या नवजात बालकाची विक्री (तस्करी) करण्यासाठी जगताप डेरी परिसरात येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी दोन रिक्षातून आलेल्या सहा महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या बाळाबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. महिलांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांच्यातील एका महिलेचे सात दिवसांचे नवजात बालक पाच लाख रुपयांना विक्री करण्याकरीता आणल्याची कबुली दिली.

आतापर्यंत पाच बाळांची विक्री

अटक करण्यात आलेल्या महिलांकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी यापूर्वी साथीदाराच्या मदतीने अशाच प्रकारे लाखो रुपयांसाठी पाच नवजात बालकांची विक्री केल्याचे कबूल केले. आरोपी महिलांना न्यायालयात हजर केले असता 16 एप्रिल पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींमध्ये नर्सचा समावेश

आरोपी महिलांनी पुण्यातील एका सुप्रसिद्ध हॉस्पिटल मधील एका नर्सच्या मदतीने पुणे शहरातील काही महिला नवजात बाळांची खरेदी विक्री व्यवहार करत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आला आहे. नर्स आणि बाळाचे खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या महिलांनी मिळुन आतापर्यंत पुणे शहरात पाच नवजात बाळांची विक्री गरजू दाम्पत्यांना केली असं पोलीस तपासात समोर आले आहे. या टोळतील महिलांनी पुणे शहरा बाहेर आणखी कुठे बाळांची खरेदी – विक्रीचे व्यवहार केले आहेत का ? याचा शोध सध्या वाकड पोलीस घेत आहेत.

गरजवंत दाम्पत्याला बाळाची विक्री

ज्या दांपत्याला वंध्यत्वाची समस्या आहे. अशा दांपत्याची माहिती हॉस्पिटल मध्ये काम करणारी नर्स या टोळतील महिलांना देत होती. त्यानंतर टोळीतील महिला वंध्यत्व समस्या भेडसावत असलेल्या दांपत्यांना मिळून त्यांना पाच ते सात लाखात नवजात बाळ विकत देण्याचा प्रलोभन देत असायच्या. त्यासाठी या टोळतील महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले दांपत्य शोधायचे. ज्या दांपत्याकडे दोन पेक्षा जास्त मुले आहेत, आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. अशा दांपत्याला पैशाचं आमिष दाखवून या टोळीतील महिला गरजवंत दांपत्याला नवजात बाळ विकत होते.

बाळ खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करणार

या प्रकरणात सध्या वाकड पोलिसांनी सहा महिलांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये भादवी 370 (3)(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्या दांपत्यांनी या टोळीतील महिलांकडून नवजात बालकांची बेकायदेशीर खरेदी केली अशा दांपत्यावरही पोलीस कठोर कारवाई करणार आहेत, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, रविकिरण नाळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुद्ध सावर्डे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, सहायक पोलीस फौजदार राजेंद्र काळे पोलीस अंमलदार वंदु गिरे, संदिप गवारी, स्वप्निल खेलते, अतिश जाधव, प्रमोद कदम, दिपक साबळे, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबीले, रामचंद्र तळपे, विनायक घार्गे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, स्वप्निल लोखंडे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, महिला अंमलदार रेखा धोत्रे, जयश्री वाखारे, ज्योती तुपसुंदर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | इतिहासाची मोडतोड करून पंडीत नेहरूंच्या परराष्ट्र धोरणांवर टीका करणार्‍या भाजप नेतृत्वाने चीन गिळंकृत करत असलेले ‘भोलेनाथा’चे कैलास वाचवावे