Pimpri-Chinchwad News | पिंपरी-चिंचवड शहरात आता ‘या’ 13 मुख्य रस्त्यावरील आणि उड्डाणपुलाखालील ठिकाणी पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार, 1 जुलैपासून अंमलबजावणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – पिंपरी चिंचवड महानगरपालिके (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) मार्फत शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी (Implementation of city parking policy) करणेत येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक 1 जुलै 2021 पासुन पिंपरी चिंचवड शहरात (PCMC City) पे अँड पार्क योजना (pay and park scheme) लागू करण्यात येत आहे. यात 13 मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील (Roads and flyovers) काही जागांचा समावेश असून त्यामध्ये एकूण 450 पे अँड पार्कची (pay and park) ठिकाणे आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत (PCMC Department of Architecture BRTS) पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी (Implementation of parking policy) करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash) व त्यांचे संबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील (Municipal Commissioner Rajesh Patil) यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिनांक 1 जुलै 2021 पासुन पिंपरी चिंचवड शहरात पे अँड पार्क योजनेची सुरवात करण्याचे निश्चित केले (Decided to launch Pay and Park Scheme in Pimpri Chinchwad city)आहे.

13 मुख्य रस्ते व उड्डाण पुलांचा समावेश
त्यामध्ये 13 मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpri-Chinchwad City) पार्किंग पॉलिसी (Parking policy) धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मे. निर्मला ऑटो क्रेन सेंटर (Nirmala Auto Crane Center) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील सर्व पार्किंग ठिकाणांची (All parking spaces) माहिती सर्व नागरिकांना व वाहन चालकांना (Citizens and drivers) होण्यासाठी यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. याठिकाणी शहरामध्ये पे अँड पार्क (Pay and park) योजना दि. 1 जुलै 2021 पासून लागु करण्यात येत आहे. त्यास लागुन असलेल्या नो पार्किंगच्या ठिकाणांच्या यादी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय (Pimpri Chinchwad Police Commissionerate) (वाहतुक विभाग) प्रसिध्द करणार आहे.

 

पे अँड पार्कचे दर (प्रति तास)

दुचाकी आणि तीन चाकी -5 रुपये
चारचाकी – 10 रुपये
टेम्पो आणि मिनी बस -25 रुपये
ट्रक आणि खासगी बस – 100 रुपये

पार्किंग ठिकाणांची यादी खालीलप्रमाणे

रस्त्यांवरील (ऑन स्ट्रीट पार्किंग) नावे

1. टेल्को रोड – 56

2. स्पाईन रोड- 55

3. नाशिक फाटा वाकड बीआरटीएस रस्ता- 41

4. जुना मुंबई पुणे रस्ता – 58

5. एम. डी.आर. –31- 39

6. काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता – 36

7. औंध रावेत रस्ता- 16

8. निगडी वाल्हेकरवाडी रस्ता – 29

9. टिळक चौक ते बिग इंडीया चौक – 08

10. प्रसुनधाम सोसायटी रोड – 11

11. थेरगाव गावठाण रोड- 12

12. नाशिक फाटा ते मोशी रोड – 24

13. वाल्हेकरवाडी रोड- 15

उड्डाणपुलाखालील जागा/ ऑफ स्ट्रीट पार्किंग

1. राँयल ग्लोरी सोसायटी वाकड

2. रहाटणी स्पॉट – 18 मॉल

3. अंकुशराव लांडगे भोसरी सभागृह- भोसरी

4. रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड

5. भक्ती शक्ती फ्लाय ओव्हर- निगडी

6. एम्पायर इस्टेट फ्लाय ओव्हर- चिंचवड

7. चाफेकर चौक ब्लॉक – 1 चिंचवड

8. चाफेकर चौक ब्लॉक – 2 चिंचवड

9. पिंपळे सौदागर वाहनतळ

10. मधुकर पवळे उड्डाण पुल निगडी

Web Title :- Pimpri-Chinchwad News | pay and park in pimpri chinchwad on 23 main roads

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

Ladakh Standoff | 70 वर्षात वर्षात पहिल्यांदा भारताने बदलली भूमिका, चीनसोबत सीमेवर पुन्हा तैनात केले 50,000 सैनिक