Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘मोक्का पॅटर्न’! पिंपरी, तळेगाव, भोसरी येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर MCOCA

पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 24 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police MCOCA Action | शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘मोक्का पॅटर्न’ (Mcoca Pattern) राबविला आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत सात महिन्यांत 24 संघटित टोळ्यांमधील 226 गुन्हेगारांवर ‘मोक्का’ची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey) यांनी पिंपरी (Pimpri Police Station), तळेगाव (Talegaon Police Station) आणि भोसरी पोलीस ठाण्याच्या (Bhosari Police Station) हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. (Pimpri Chinchwad Police MCOCA Action)

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरे टोळीवर मोक्का कायद्यानुसार (Pimpri Chinchwad Police MCOCA Action) कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख यशवंत उर्फ अतुल सुभाष डोंगरे (वय-22 रा. पोलीस चौकी मागे, संत तुकाराम नगर, पिंपरी), सुशांत उर्फ दगडी आण्णा अनिल जाधव (वय-19 रा. नेहरुनगर, पिंपरी), शुभम कैलास हजारे (वय-25 रा. अजमेरा, पिंपरी), अजिंकय अरुण टाकळकर (वय-21 रा. मोशी, पुणे), सुशांत उर्फ भैय्या अजिनाथ लष्करे (वय-22 रा. वल्लभनगर, पिंपरी), कृष्णा धोंडीराम शिंदे (वय-25 रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), मयुर प्रकाश परब (वय-22 रा. वल्लभनगर, पिंपरी) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर पिंपरी पोलीस ठाण्यात आयपीसी 302, 120(ब), 201, 143, 147, 149, आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल आहे. या गुन्ह्यात मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. टोळी प्रमुख व त्याच्या साथीदारांवर एकूण 8 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 7 गंभीर गुन्हे आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख सुधीर परदेशी याच्यासह पाच जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख सुधीर अनिल परदेशी (वय-25 रा. केशवनगर, वडगाव), विवेक नंदकिसोर लाहोटी (वय-42 रा. शाहुनगर, चिंचवड), प्रतिक्षा विक्रांत भोईर (वय-29 रा. वडगाव), पाहिजे आरोपी शरद मुरलीधर साळवी (वय-30 रा. काळेवाडी, मुळ रा. भदनापुर, जालना), भाऊ (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख व त्याच्या साथीदारांना आजपर्यंत सहा गंभीर गुन्हे केले आहेत.

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मोतीरावे टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख सौरभ संतुराम मोतीरावे (वय-20 रा. आळंदी, पुणे), आकाश गोविंद शर्मा वय-22 रा. संत तुकाराम नगर, भोसरी), राम सुनिल पुजारी (वय-21 रा. मोशी), ओंमकार मल्हारी दळवी (रा. दिघी) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या टोळीवर 9 गुन्हे दाखल असून यामध्ये 6 गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत.

डोंगरे, परदेशी आणि मोतीरावे टोळी प्रमुख व सदस्यांनी स्वत:ची संघटीत टोळी तयार करुन टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींनी पिंपरी, चाकण, तळेगाव दाभाडे, भोसरी, कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत, खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, पुरावा नष्ट करणे, घरात घुसुन मारहाण करणे, विना परवाना शस्त्र बाळगणे, गाड्यांची, सामानाची तोडफोड व जाळपोळ करुन नुकसान करणे असे गुन्हे केले आहेत. या टोळ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयात सादर करण्यात आला होता. अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi) यांनी अर्जाची छाननी करुन मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Joint CP Dr. Sanjay Shinde),
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 विवेक पाटील (DCP Vivek Patil), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश माने
(ACP Satish Mane), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर (ACP Balasaheb Kopner),
देहुरोड विभाग सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanwat),
सहायक पोलीस आयुक्त सतिश कसबे (ACP Satish Kasbe) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा
पी.सी.बी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत (P.C.B. Crime Branch PI Balkrishna Sawant),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने (Senior PI Ram Rajmane), वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव
(Senior PI Bhaskar Jadhav), पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे (PSI Suhas Khade),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम (Senior PI Jitendra Kadam), दरोडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख (API Ambarish Deshmukh), पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, अनिल गायकवाड, ओंकार बंड, दत्ताजी कौठेकर, सागर शेंडगे, विनोद वीर, मच्छिंद्र बांबळे, संदिप जोशी यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune: Charity fashion show of doctors held successfully in city

Ranveer Singh And Deepika Padukone | ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर थिरकली दीपिका; रणवीरने व्हिडिओ केला शेअर

Kashish Social Foundation | राज्यातील डॉक्टरांचा चॅरिटी फॅशन शो मोठ्या उत्साहात संपन्न

Daisy Shah | अभिनेत्री डेजी शाहने केले अर्चना गौतमवर आरोप; सुनावले खडेबोल

Maharashtra CM Ekanth Shinde sanctioned Rs 8 crore for renovation of Gadkari Rangayatam auditorium in Thane