Daisy Shah | अभिनेत्री डेजी शाहने केले अर्चना गौतमवर आरोप; सुनावले खडेबोल

पोलीसनामा ऑनलाइन – Daisy Shah | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अर्चना गौतम ही नेहमी चर्चेत असते. अर्चानाने ‘हिंदी बिग बॉस 16’ व्या सिजनमध्ये (Hindi Bigg Boss 16) राडा घालून व अनेक भांडणे करुन तिचा दबदबा निर्माण केला होता. त्यानंतर ती रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाड़ी’ (Khatron Ke Khiladi) या रिय़लिटी शो मध्ये सहभाग नोंदवला. यामध्ये अभिनेत्री डेजी शाह (Actress Daisy Shah) हिने देखील सहभाग घेतला होता. डेजी व अर्चना (Archana Gautam) यांच्यामध्ये अनेकदा भांडणे व वादविवाद झालेले दिसून आले आहेत. यामध्ये डेजीने अर्चनाला आता खडेबोल सुनावले आहे.

अर्चना ही नेहमी तिचे म्हणणे खरे ठरवण्यासाठी जीवाचा आटापीटा केलेली दिसून येते. अर्चना गौतम (Archana Gautam) ही तिच्या याच गुणांमुळे काहीना आवडते तर काहींना तिचे हे वागणे आवडत नाही. अर्चनाने रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) ‘खतरों के खिलाड़ी’ या कार्यक्रमामध्ये ही तिच्या वेगळ्या अंदजात खेळी खेळली. मात्र तिच्यावर अभिनेत्री डेजी शाह हिने आता आरोप (Daisy Allegation On Archana) केले आहे. डेजीने हे स्वतः सांगितले आहे की ती एकदा कोणताही टास्क गेम मध्ये करत नव्हती. तरी अर्चना तिला फॉर्सफुली टास्क कसा खेळावे याबद्दल ज्ञान देत बसली होती. डेजीला यावर वाटले की, एवढा टास्क तुला एकटीलाच समजतो तर तुच टास्क करत जा. त्याची भांडणे अनेकदा समोर आली आहेत. डेजीने अर्चनाला इरिटेटिंग एंटरटेनमेंट असे म्हणून हिणवले होते. तर अर्चनाने तिला फ्लॉप मुव्हीची एक्टर असे चिडवले होते.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डेजीने अर्चनाला (Daisy Shah And Archana Gautam) चांगलेच सुनावले. डेजी म्हणाली की,“अर्चनाला फुकटाचा ड्रामा करणे खूप आवडते. जसे आपण एखाद्याच्या निर्णयाचा किंवा बोलण्याचा आदर करतो, ती तसे करत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्याला माझ्याबद्दल काही आवडत नसेल तर मी त्याचा आदर करेन कारण तो त्यांचा दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे मी जेव्हा एखाद्याबद्दल बोलते तेव्हा तो माझा दृष्टिकोन असतो, मात्र अर्चनाचं असं नाही.” पुढे ती म्हणाली, “जाऊ द्या, ही माझी चूक आहे. मी अशा व्यक्तीबद्दल बोलतीये जिला फक्त ड्रामा करायला आवडतो. ती रियल लाईफ ड्रामा आहे.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune: PCMC Disburses Rs 10.09 Crore To Bank Accounts Of Over 28K Students Under DBT Scheme

Bipasha Basu | 9 वर्षे चित्रपटांमध्ये काम केले नसले तरी बिपाशा जगते लग्जरी आयुष्य; कोट्यवधी रुपयांची मालकीण

Crop Insurance | पीक विमा हप्ता भरण्यासाठी केंद्राकडून 3 दिवसांची मुदतवाढ, महाराष्ट्र शासनाच्या विनंतीला केंद्राची मंजुरी

Pune Fire News | संभाजी उद्यानातील मत्स्यालयाला आग; वातानुकुलित यंत्रांनी घेतला पेट