Pimpri Crime | पिंपरीत आढळला ब्रिटिश कालीन ‘बॉम्ब’, परिसरात खळबळ

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पिंपरीमध्ये (Pimpri Crime) ब्रिटिशकालीन (British) ‘बॉम्ब’ (bomb) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज (सोमवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरीत उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी (Pimpri Crime) घटनास्थळी धाव घेतली आहे. बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पिंपरी येथील क्रोमा सेंटर (Chroma Center Pimpri) जवळ बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली आहे. क्रोमाच्या पाठीमागे असलेल्या कोहिनूर सोसायटीमध्ये (Kohinoor Society) गार्डनमध्ये खोदाईचे काम सुरु आहे.
खोदाई करत असताना मजुरांना बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आली.
याची माहिती पिंपरी पोलिसांनी मिळताच पिंपरी पोलीस ठाण्यातील (Pimpri Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सध्या या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) दाखल झाले आहे.
पथकाकडून बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु आहे. हा बॉम्ब ब्रिटीशकालीन असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सागर कवडे (Assistant Commissioner of Police Sagar Kavade) हे घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात नागरिकांना येण्यास मनाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Web Title : Pimpri Crime | British ‘bomb’ found in Pimpri, commotion in the area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis And Amit Shah | फडणवीस HM अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल; भाजप नेत्यांची खलबतं, चर्चेला उधाण

MLA Abu Azmi | वाढदिवसानिमित्त काढली भव्य मिरवणूक; अबू आझमींसह अन्य कार्यकर्त्यांवर FIR दाखल

Complete diet | दूध पचवण्यास होत असेल समस्या? जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि योग्य प्रमाण