Pimpri Dighi Crime | पिंपरी : दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Dighi Crime | उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करुन घरातील कपाटील एक लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेणाऱ्या महिलेला दिघी पोलिसांनी (Dighi Police Station) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.(Woman Arrest In Gold Theft)

याबाबत वैष्णवी बापु सुपेकर (वय 38 रा. चौधरी पार्क, दिघी, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करुन बेडरुममधील लोखंडी कपाटातील साडे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दोन मंगळसुत्र असा एकूण एक लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. हा प्रकार 9 मार्च सकाळी दहा ते 14 मार्च या कालावधीत घडला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना फिर्यादी यांच्या घरासमोर राहणाऱ्या महिलेबाबत माहिती मिळाली. फिर्यादी यांच्या घरासमोर राहणाऱ्या महिलेची कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची होती. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने चोरलेले सोन्याचे दागिने पोलिसांना काढून दिले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार,
सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ,
पोलीस उपनिरीक्षक शिंगारे, महिला पोलीस उपनिरीक्षक गुळवे, पोलीस अंमलदार जाधव, के.टी. पंडीत, कसबे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMRDA News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचे आवाहन

Pune News | आगामी काळात रा.स्व. संघ ‘पंच परिवर्तन’ सूत्रावर आधारित काम करणार – प्रांत संघचालक प्रा. सुरेश जाधव

Chakan Firing Case | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार, चाकण परिसरातील घटना