Pimpri PCMC News | पिंपरी-चिंचवडला 2025 नंतरच दररोज पाणी मिळणार – मनपा आयुक्त शेखर सिंह

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri PCMC News) नागरिकांना २०२५ नंतरच दररोज मुबलक पाणी मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मागील साडेतीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठ्याला येथील नागरीक सामोरे जात आहेत. भामा आसखेड (Bhama Askhed Dam) आणि आंद्रा धरणातील (Andhra Dam) मंजूर पाणी आणण्यासाठी सुरू असलेले जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्राचे काम एकाच वेळी पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. सन २०२५ पर्यंत ही कामे पूर्ण होतील, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह (IAS Shekhar Singh) यांनी आहे. (Pimpri PCMC News)

पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर पाणी आणणार आहे. या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्यासाठी चिखली येथे आठ हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. सध्या आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना दिले जात असले तरी ते कमी पडत आहे.

आयुक्त सिंह यांनी सांगितले की, भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highway Authority), वन, जलसंपदा विभागाच्या जागेतून असल्याने भूसंपादनात अडचणी येत आहेत. (Pimpri PCMC News)

भूसंपादनाच्या अडचणी सोडवण्याच्या कामाला गती दिली आहे. महापालिका हद्दीतील आठ किलोमीटर जलवाहिनीचे
काम पूर्ण झाले आहे. दर महिन्याला कामाचा आढावा घेतला जात आहे. २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल.

सध्या शहरातील नागरिकांना पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवना
धरणातून ५१०, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून ७० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून १३ असे ५९३
दशलक्ष लिटर पाणी उचलते.

आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती शासनाने उठवली आहे.
काम सुरू करण्याबाबत जुन्या ठेकेदारासोबत चर्चा सुरू आहे. नव्याने आराखडा करायचा, की पूर्वीप्रमाणेच काम सुरू
करायचे याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेतला जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule On BJP Modi Govt | सुप्रिया सुळे यांचा मोदी सरकारवर घणाघात; देशावरील कर्ज दुप्पट केलं…सरकारने माफी मागावी