PM Awas | पीएम आवास योजनेबाबत तुम्हाला सुद्धा असेल काही अडचण तर ‘इथं’ करा तक्रार; ‘इतक्या’ दिवसात निघेल मार्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Awas | पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) गरिब, बेघरांना घर दिले जाते. सोबतच कर्ज, घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी सरकारद्वारे सबसिडीसुद्धा मिळते. तुम्हाला या योजनेबाबत काही तक्रार असेल तर ती नोंदवू शकता.

कुठे करावी पीएम आवास योजनेसंबंधी तक्रार

पंतप्रधान आवास योजना (PM Awas Yojana) -ग्रामीणच्या बाबतीत ग्राम पंचायत, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर तक्रार निवारण व्यवस्था आहे. प्रत्येक स्तरावर तक्रार मिळाल्याच्या तारखेपासून 45 दिवसात तिचे निवारण करण्याची तरतूद आहे. अधिका माहितीसाठी स्थानिक आवास सहायक किंवा तालुका विकास अधिकार्‍याशी संपर्क करा.

 

असा करा पीएम आवास (PM Awas Yojana) साठी अर्ज

1. यासाठी मोबाइल आधारित आवास अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा.

2. नंतर मोबाइल नंबरच्या सहायाने लॉग इन आयडी तयार करा.

3. यानंतर अ‍ॅप मोबाइल नंबरवर एक वन टाइम पासवर्ड पाठवेल.

4. याच्या मदतीने लॉगिन केल्यानंतर मागितलेली माहिती भरा.

5. पीएमएवाय अंतर्गत घरासाठी अर्ज केल्यानंतर केंद्र सरकार लाभार्थी निवडते.

6. यानंतर लाभार्थींची फायनल लिस्ट पीएमएवायच्या वेबसाईटवर टाकली जाते.

काय आहे सरकारचे टार्गेट

सरकार या स्कीम अंतर्गत पक्के घर बनववण्यासाठी रक्कम उपलब्ध करून देते. ज्यांचे जुने घर आहे, त्यांना पक्के घर बांधण्यासाठी केंद्र सरकार मदत करते. 2022 पर्यंत 1 कोटी लोकांना पक्की घरे देध्याचे लक्ष्य आहे.

 

Web Title : PM Awas | you can register your complaint under pradhan mantri awas yojana at gram panchayat block district and state level

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

GST कौन्सिलने ‘या’ वस्तूंच्या दरात केला बदल, तपासून पहा संपूर्ण यादी

MEDICINE ATM | खुशखबर ! आता ATM मधून बाहेर पडतील औषधे, प्रत्येक तालुक्यात लावणार मशिन्स, जाणून घ्या मोदी सरकारचा पूर्ण प्लान

अलर्ट ! EPFO ने 6 कोटी PF खातेधारकांना पैशांबाबत जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या