MEDICINE ATM | खुशखबर ! आता ATM मधून बाहेर पडतील औषधे, प्रत्येक तालुक्यात लावणार मशिन्स, जाणून घ्या मोदी सरकारचा पूर्ण प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MEDICINE ATM | दुर्गम भागात राहणार्‍या ग्रामस्थांना आता 24 तास औषधे उपलब्ध होतील. त्यांना केवळ तालुक्याच्या ठिकाणी लावलेल्या एटीएमपर्यंत पोहचावे लागेल. देशातील सर्व 6000 तालुक्यांमध्ये अशा एटीएम मशीन (MEDICINE ATM) लावण्याची सुरुवात होणार आहे. शुक्रवारी आयटी मंत्रालयांतर्गत काम करणार्‍या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ने या कामासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या एएमटीझेड नावाच्या कंपनीसोबत करार केला.

सीएससीची अगोदरच तालुकास्तरावर अयुर संजीवनी केंद्र (MEDICINE ATM) सुरू आहेत. औषधे देणारी एटीएम याच केंद्रांवर लावली जातील. या केंद्रावर गर्भधारण, कोरोना तपासणीसह अनेक वैद्यकीय उपकरणे सुद्धा ठेवली जातील. याच्या संचालनासाठी सीएससीच्या ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून प्रशिक्षित केले जाईल.

सीएससीची माध्यमातून गावांमध्ये ऑक्सीजन सिलेंडर किंवा कॉन्संट्रेटर पुरवले जातील. किरकोळ भाडे देऊन त्यांचा वापर करता येईल. चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरपर्यंत सर्व तालुक्यात औषधे देणार्‍या एटीएम मशीन लावण्याचे लक्ष्य आहे.

एटीएम मशीनमध्ये टाकली जाईल डॉक्टरची प्रीस्क्रीप्शन
सीएससी एसपीव्हीचे एमडी दिनेश त्यागी यांनी सांगितले की, सीएससीच्या संजीवनी केंद्रावर ग्रामस्थ अगोदरच व्हर्च्युअल पद्धतीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे काम करत आहेत. हे डॉक्टर त्यांना औषधेसुद्धा लिहून देतात. औषधाची प्रीस्क्रीप्शनसुद्धा व्हर्च्युअल पद्धतीने जनरेट होते.

परंतु, ग्रामस्थांना औषधे घेण्यासाठी शहरात यावे लागते किंवा कुणाला तरी पाठवावे लागते, ज्यासाठी वेळ लागतो. परंतु आता सर्व तालुक्यात औषधे देणारी एटीएम असल्याने तात्काळ औषधे मिळतील.

एटीएम मशीनमध्ये डॉक्टरची प्रीस्क्रीप्शन टाकली जाईल आणि त्या हिशेबाने औषध बोर येईल. मशीनमध्ये ई-कॉमर्स कंपन्या औषधे पुरवतील. औषधांच्या एटीएम मशीनमध्ये बहुतांश जेनरिक औषधे ठेवली जातील. याशिवाय केंद्रावर विविध प्रकारची चाचणी उपकरणे सुद्धा मिळतील.

मेडिकल उपकरणाच्या वापरासाठी प्रशिक्षण
त्यागी यांनी सांगितले की,
पुढील महिन्यापासून एएमटीझेड ग्रामीण उद्योजकांना मेडिकल उपकरणांच्या वापरासाठी विशाखापट्टनममध्ये प्रशिक्षण कार्यक्रम चालवण्यात येणार आहे.
या ग्रामीण उद्योजकांना औषधांच्या एटीएम मशीनच्या संचालानाचे प्रशिक्षण दिले जाईल.

एका बॅचमध्ये 100 ग्रामीण उद्योजकांना मोफत प्रशिक्षित केले जाईल आणि त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जाईल.
औषधांच्या मशीनसह केंद्रावर पाण्याची शुद्धता तपासली जाईल.
जेणेकरून ग्रामस्थांना जलजन्य आजारांपासून दूर राहता येईल.
त्यांना स्वच्छ पाण्यासाठी जागरूक करता येईल.
संजीवनी केंद्रांद्वारे ग्रामीण स्तरावर आरोग्य सेवेचा एक उपयोगी वातावरण तयार करायचे आहे.

Web Titel :- MEDICINE ATM | national medicines will come out of atms machines will be installed in every block

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अलर्ट ! EPFO ने 6 कोटी PF खातेधारकांना पैशांबाबत जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून पार पडला दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा

BJP vs NCP | अनिल देशमुखांना लपायला देखील राष्ट्रवादीने सुरक्षित जागा दिलीय का? भाजप नेत्याचा सवाल