PM Modi On Congress In Pune | काँग्रेसच्या 60 वर्षात अर्ध्यापेक्षा जास्त जनता मुलभूत सुविधांपासून वंचित, आम्ही 10 वर्षात त्या पूर्ण केल्या : पंतप्रधान मोदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PM Modi On Congress In Pune | काँग्रेसने देशात साठ वर्ष राज्य केले. पण काँग्रेसच्या सत्ताकाळात देशातील अर्ध्यापेक्षा जास्त जनतेकडे मुलभूत सुविधा नव्हत्या. आम्हाला तर आता फक्त दहा वर्षे तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. पण या दहा वर्षात आम्ही मुलभूत गरजा पुर्ण केल्या, सोबतच प्रत्येक वर्गाची आकांक्षा पूर्ण करायला जीव ओतून काम केले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेसकोर्स, पुणे येथे आयोजित सभेत केला. महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि इतर तीन उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. (Pune Lok Sabha)

पंतप्रधान नरेंद्र म्हणाले, शहरात राहा, किंवा गावात, चांगले रस्ते बघून, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बघून मन प्रसन्न होते. मेहनत तुम्हालाही करावी लागेल. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरने आपल्याला विश्वास निर्माण होतो. इथे पुणे मेट्रो पाहा, पुणे विमानतळाचे पालटलेले नवे रुप पाहा, पालखी मार्ग पाहा, समृद्धी महामार्ग बघा, प्रत्येक जागेला कनेक्ट करणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन बघा, हे सर्व आधुनिक होणाऱ्या भारताची प्रतिमा आहे.(PM Modi On Congress In Pune)

पंतप्रधान मोदी पुणेकर आणि महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून म्हणाले, लिहून घ्या, ही मोदीची गॅरंटी आहे, तो दिवस येणारच आहे, जेव्हा तुम्ही देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनने प्रवास करणार. काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, डॉ. मनमोहन सिंह यांचे जे रिमोटवाले सरकार होते त्या सरकारने १० वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला तेवढा खर्च आम्ही १ वर्षात करतो. आजचा भारत आपल्या युवकांचे संशोधन, टॅलेंट आणि टेक्नॉलिजवर विश्वास ठेवून पुढे जात आहे.

मोदी पुढे म्हणाले, स्टार्टअप इंडियाची कमाल पाहा, फक्त १० वर्षात भारतीय युवकांनी सव्वा लाखापेक्षा जास्त स्टार्टअप बनवले आहेत. गर्वाची बाब म्हणजे यापैकी अनेक हे आपल्या पुण्यातील तरुण आहेत. माझ्या देशाचे तरुण त्यात पुढे जात आहेत. अवकाश, सुरक्षा विभाग, उद्योग अशा विविध विभागात प्रगती सुरु आहे. पुण्यात बुद्धिमान तरुण आहेत. आम्ही १ लाख कोटी रुपये, जे लोक इनोवेशन करु इच्छितो, त्यांना डोळे झाकून देण्याचा निर्णय घेतला आहे. देश जगातही आपली चमक दाखवत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, दहा वर्षांपूर्वी भारतात मोबाईल आयात करावे लागत होते. आता भारत जगातला दुसरा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. मेड इन इंडिया चिप्सने जगातल्या गाड्या चालताना दिसतील आणि माझे पुणे शहर तर ऑटोमोबाईल हब आहे. आता आम्ही भारताला इलेक्ट्रिक वेहिकलचा हब बनताना बघू, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजपचा संकल्प हा भारताला सेमी कंडक्टर हब, इनोवेशन हबमध्ये बनवण्याचा आहे. भारतात हायड्रोजन हब बनवण्याचा संकल्प आहे. हे आमचे पहिले असे सरकार आहे ज्याने सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला आहे, असे मोदी म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Cop In Pune | पुणे : दुचाकीस्वाराकडून पोलिसाला शिवीगाळ करुन खुर्चीने मारहाण

Congress Vs BJP | पक्ष, नेते फोडण्यापाठोपाठ आता उमेदवार पळविण्याचा भाजपाचा ‘खेळ’, सूरतनंतर एमपीत काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती