PM Modi Pune Visit | कर्नाटक आणि राजस्थानमध्ये विकासकामे ठप्प, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकास्त्र (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने (Lokmanya Tilak National Award) गौरवण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात मेट्रोच्या फुगेवाडी स्थानक (Metro Phugewadi Station) ते दिवाणी न्यायालय (Civil Court) आणि गरवारे स्थानक (Garware Station) ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक (Ruby Hall Clinic Station) या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी (PM Modi Pune Visit) यांच्या हस्ते बटन दाबून करण्यात आले. तसेच पंतप्रधान आवास योजनेतील (Pradhan Mantri Awas Yojana) घरांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाषणात मोदींनी कर्नाटक (Government of Karnataka) आणि राजस्थान सरकारवर (Government of Rajasthan) टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज भारत सर्वात गतीने 5 जी सर्व्हिस (5G service) देणारा देश आहे. या देशातील तरुण सर्वच क्षेत्रात कमाल करत आहेत. एकिकडे महाराष्ट्र विकास करत असताना दुसरीकडे कर्नाटकात काय होत आहे ते आपण पाहत आहोत. ज्याप्रमाणे विकास होणे अपेक्षित होते तसा कर्नाटक राज्याचा विकास होताना दिसत नाही. ज्या घोषणा दिल्या त्या पूर्ण होत नाहीत. ही परिस्थिती देशासाठी खूप चिंताजनक आहे. अशीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे. त्या ठिकाणी विकासाची कामे ठप्प झाली असल्याची टीका मोदी यांनी यावेळी केली.

आमचं सरकार मध्यमवर्गीय लोकांचे सरकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मला पुण्यात येण्याचं सौभाग्य (PM Modi Pune Visit) मिळालं. देशभर स्वप्नांना पूर्ण करणारा पुणे हे जिवंत शहर आहे. आता 15 हजार करोड रुपये प्रकल्पांचे उद्घाटन झालं आहे. हजारो लोकांना घरे मिळाली आहेत. आमचे सरकार मध्यमवर्गीय लोकांच्या हिताचं सरकार आहे. पुणे मेट्रोच्या (Pune Metro) अजून एक स्टेशनचे लोकार्पण झालं आहे. या पाच वर्षात मेट्रो नेटवर्क (Metro Network) सुरु झालाय. आपल्याला पब्लिक ट्रान्सफोर्टला आधुनिक बनवावा लागेल. यासाठी मेट्रोचा विस्तार होत आहे. मेट्रो नेटवर्क आधुनिक भारताची नवी लाईफलाईन असल्याचे मोदी म्हणाले.

सर्वांची स्वप्न पूर्ण करण्याची गॅरंटी मोदींची

2014 मध्ये तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली.
मागील नऊ वर्षात आमच्या सरकारने गाव आणि शहरात 4 कोटी घरे तयार केली आहेत.
शहरी गरिबांसाठी 75 लाख घरे आम्ही तयार केली आहेत.
जी घरे आम्ही तयार करतो त्यामधील सर्वाधिक घरे महिलांच्या नावावर केली जातात.
या घरांची किंमत काही लाखात आहे. या माध्यमातून मागील काही वर्षात अनेक बहिणी लखपती झाल्यात.
गरीब असो की मध्यमवर्गीय या सर्वांची स्वप्न पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Empowering Schools with Holistic and Future-Ready Education: BeyondSkool Launches ‘Education Leaders of India’ in Pune

Pune: Prime Minister Narendra Modi Honored with 41st Lokmanya Tilak National Award