PM Modi Sabha In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर गंभीर आरोप, AI द्वारे व्हिडीओ बनवून अघटित घडवण्याचा डाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PM Modi Sabha In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर अत्यंत गंभीर असा आरोप केला आहे. मोदी म्हणाले की, आर्टिफिशल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence – AI) वापर करून भाजपच्या अनेक नेत्यांच्या आवाजात फेक व्हिडीओ तयार करण्याचे काम सुरू आहे. शांततेत निवडणुका होऊ नयेत, यासाठी येत्या महिनाभरात देशात काहीतरी अघटित घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव आहे.(PM Modi Sabha In Pune)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल सोलापूर, कऱ्हाड आणि पुणे येथे प्रचारसभा झाल्या. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), तसेच जिल्ह्यातील इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी काल पुण्यातील रेसकोर्स (Pune Race Course) येथे मोदींची सभा झाली.

या सभेत मोदींनी काँग्रेस तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही आणि धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्न करू देणार नाही, असे ते म्हणाले. तर शरद पवार यांचे नाव न घेता त्यांचा भटकती आत्मा असा उल्लेख करत मोदींनी टीका केली.

दरम्यान, कऱ्हाड येथील सभेत मोदींनी वन रँक वन पेन्शनवर भाष्य केले. ते म्हणाले, या देशामध्ये काँग्रेसने प्रदीर्घ काळ
राज्य केले. परंतु, भारतीय सैनिकांना वन रँक वन पेन्शनपासून वंचित ठेवले. पण, आम्ही तो शब्द दिला होता.
तो पूर्ण करून दाखविला. ही मोदींची गॅरंटी आहे.

काल रात्री पंतप्रधान मोदी हे पुण्यातील राजभवन येथे मुक्कामी होते.
आज पंतप्रधान मोदी यांच्या माळशिरस, लातूर व धाराशिव येथे सभा होणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi Sabha In Pune | काँग्रेस संविधानाचा अपमान करतेय, कर्नाटकात एका रात्रीत सर्व मुस्लिमांना ओबीसी केले, पीएम मोदींचा घणाघात

Punit Balan Group (PBG) – Constitution Park Pune | लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान !