PM Modi Sabha In Pune | काँग्रेस संविधानाचा अपमान करतेय, कर्नाटकात एका रात्रीत सर्व मुस्लिमांना ओबीसी केले, पीएम मोदींचा घणाघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PM Modi Sabha In Pune | संविधानाचा खरा अपमान काँग्रेसच करत आहे. कर्नाटकात त्यांनी एका रात्रीत सर्व मुस्लिमांना ओबीसी केले. त्यामुळे मुळ ओबीसींच्या आरक्षणावर टाच आली. संविधानात कुठेही धर्माच्या आधारावर आरक्षण द्या असे म्हटलेले नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली. तसेच धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही, असेही स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनाही लक्ष्य केले.(PM Modi Sabha In Pune)

पुणे लोकसभचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), तसेच अन्य तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा रेसकोर्स येथे पार पडली. यावेळी पगडी घालून मोहोळ यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) तसेच मुरलीधऱ् मोहोळ, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) , शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalrao Patil) व श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे चारही उमेदवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

काँग्रेसवर हल्ला चढवताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसने साठ वर्षात जे केले नाही ते मागील दहा वर्षात आम्ही केले.
आम्ही देश आत्मनिर्भर केला. देश आता जगातील दुसऱ्या क्रमाकांचा निर्यातदार देश आहे.
संरक्षण साधनांच्या उत्पादनात आपण आत्मनिर्भर झालो. त्यांना साध्या मुलभूत सुविधाही देता आल्या नाहीत, मागील दहा वर्षात देशात सव्वालाख स्टार्टअप सुरू झाले. इंग्रजांनी केलेले कायदे आहे तसेच सुरू होते, ते आम्ही बदलले.

नरेंद्र मोदी म्हणाले, दहा वर्षांच्या आमच्या कार्यकाळात एकही बॉम्बस्फोट झालेला नाही.
देश विकासाच्या वाटेवर वेगात चालला आहे. आता सत्तर वर्षांवरील सर्व व्यक्तींचे वैद्यकीय उपचार विनामुल्य केले जातील.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना नरेंद्र मोदी नाव न घेता म्हणाले, महाराष्ट्रातील एका नेत्याने पस्तीस
वर्षांपूर्वी राज्यात सत्ताबदल केला. तेव्हापासून राज्यात एकही मुख्यमंत्री आपला कार्यकाल पूर्व करू शकला नाही.
याच नेत्याने सन १९९५ लाही युतीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi On Sharad Pawar | पंतप्रधान मोदी शरद पवारांचे नाव न घेता म्हणाले,
”महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा”, तर राहुल गांधींची उडवली खिल्ली…