वाराणसीच्या डॉक्टरांना संबोधित करताना PM मोदी झाले ‘भावूक’; दिला नवा मंत्र म्हणाले – ‘जहां बीमार वहीं उपचार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाराणसीचे डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी पंतप्रधान मोदी त्यांच्याशी बोलताना भावूक झाले होते.

पंतप्रधान मोदी भावूक होऊन म्हणाले, या व्हायरसने आपल्यातल्या अनेकांना दूर केले आहे. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आपल्या अनेक मोर्चांवर एकसाथ लढावे लागत आहे. यावेळी पॉझिटिव्हीटी रेटही अनेक पटींनी जास्त आहे. रुग्णांना जास्त दिवसांपर्यंत रुग्णालयात राहावे लागत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणांवर ताण येत आहे. या असाधारण परिस्थितीतही आपले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा ताणही सांभाळता येत आहे.

तसेच तुम्ही पूर्ण मेहनतीने आणि जीवेभावे सेवा केली. बनारसने ज्या वेगाने इतक्या कमी वेळात ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सची संख्या अनेक पटींनी वाढवली. पंडित राजन मिश्र कोविड रुग्णालय सक्रीय केला, हे एक उत्तम उदाहरण आहे.

‘जहां बीमार वहीं उपचार’

पंतप्रधान मोदींनी आता नवा मंत्र दिला आहे, ‘जहां बीमार वहीं उपचार’ (जिथं आजार तिथं उपचार) या सिद्धांतानुसार मायक्रो-कंटन्मेंट झोन बनवून ज्याप्रकारे तुमचे शहर आणि गावांतील घरात औषधे वाटली जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे. हे अभियान जितके जमेल तेवढे व्यापक करणे गरजेचे आहे.

बनारस आणि पूर्वांचलच्या ग्रामीण भागातही विशेष लक्ष द्यायचंय

आपण ही महामारीला चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. मात्र, आता ही वेळ आनंदाची नाही. कारण आता आपल्याला आणखी मोठी लढाई लढायची आहे. आपल्याला बनारस आणि पूर्वांचलच्या ग्रामीण भागातही विशेष लक्ष द्यायचे आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.