PM Narendra Modi In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पुण्यात मुक्काम; राजभवन परिसरात कडेकोट बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PM Narendra Modi In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या उमेदवारांच्या (Mahayuti Candidates) प्रचारासाठी पुण्यात आले आहेत. पुण्यातील रेसकोर्स येथील सभा (Pune Race Course) आटोपल्यानंतर मोदी पुण्यातच मुक्काम करणार आहेत. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच पुण्यात मुक्कामी आहेत. ते ज्या ठिकाणी राहणार आहेत त्या राजभवन (RajBhavan Pune) परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.(PM Narendra Modi In Pune)

पंतप्रधान मोदी आज पुण्यात मुक्काम करून उद्या धाराशिव आणि माळशिरस येथील प्रचारसभेसाठी निघतील. पुण्यात मोदींचा मुक्काम असल्याने राजभवन परिसरात कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही.

आजची सभा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील राजभवनात येतील. सभास्थळ ते राजभवन या मार्गावर देखील बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Cop In Pune | पुणे : दुचाकीस्वाराकडून पोलिसाला शिवीगाळ करुन खुर्चीने मारहाण

Congress Vs BJP | पक्ष, नेते फोडण्यापाठोपाठ आता उमेदवार पळविण्याचा भाजपाचा ‘खेळ’, सूरतनंतर एमपीत काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती