PM Narendra Modi | आज सायंकाळी PM मोदींची चंद्रपूरमध्ये सभा, आगमनापूर्वी म्हणाले महाराष्ट्रातील जनमानसाने महाप्रण केलाय…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – PM Narendra Modi | चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील (Chandrapur Lok Sabha Election 2024) भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा सायंकाळी होत आहे. चंद्रपुरातील मोरवा विमानतळालगत १६ एकर जागेवर ही सभा होईल. या सभेपूर्वी सभेपूर्वी पंतप्रधान मोदींनी मराठीत एक्सवर एक पोस्ट करत विरोधकांना डिवचले आहे.(PM Narendra Modi)

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील जनमानसाने लोकसभा निवडणुकीत भाजपा – एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचा महाप्रण केला आहे. चंद्रपुरात आज संध्याकाळी ५ वाजता आपल्या प्रियजनांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळणार आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील आजच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पंतप्रधान या सभेत कोणते मुद्दे उपस्थित करणार याकडे सर्वच राजकीय पक्ष लक्ष ठेवून आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या आजच्या सभेसाठी मोरवा विमानतळालगत १६ एकर शेतात जय्यत तयारी केली आहे.
येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नरेंद्र मोदी हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या
प्रचार सभेकरिता चंद्रपूरला आले होते. ते त्या वेळी पंतप्रधान नव्हते.
त्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले व नंतर मोदी पंतप्रधान झाले. आता दहा वर्षांनंतर ते चंद्रपुरात येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chandan Nagar Crime | पुणे : उधारीवर सिगारेट न दिल्याने धारधार शस्राने केले वार, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR

Pune Dhayari Crime | पुणे : जुन्या वादातून टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन सराईत गुन्हेगारांना अटक