PM Svanidhi Yojana | पैशाची गोष्ट ! आता आणखी सहज मिळेल कर्ज, आरबीआयनं आणलाय विशेष प्रकारचा प्लान; जाणून घ्या कोणाला मिळणार

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM Svanidhi Yojana | फेरीवाले-विक्रेत्यांना आता आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सहजपणे PM Svanidhi Yojana अंतर्गत Loan मिळेल. कारण रिझर्व्ह बँकेने पॉईंट ऑफ सेल (पीओएस) सारख्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या आणि दुसर्‍या श्रेणीच्या केंद्राच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत येणार्‍या फेरीवाले-विक्रेत्यांना PIDF योजनेचा लाभ देण्यास सुरूवात केली आहे. PM Svanidhi Yojana Covid Mahamari च्या दरम्यान फेरीवाले-विक्रेत्यांसाठी सुरू केली गेली आहे.

योजना यावर्षी जानेवारीपासून सुरू

ADV

पेमेंट पायाभूत सुविधा विकास फंड (PIDF) योजना तिसर्‍यापासून सहाव्या श्रेणीच्या केंद्रांमध्ये डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 30 लाख नवीन पीओएस बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.
हा फंड 345 कोटी रुपयांचा आहे.
योजना यावर्षी जानेवारीमध्ये सुरू झाली.
योजनेचा लाभ आता पहिल्या आणि दुसर्‍या श्रेणीच्या निवडक केंद्रांवर फेरीवाले-विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे.

पीएम फेरिवाले-विक्रेता आत्मनिर्भर निधी

फेरीवाले-विक्रेता आत्मनिर्भर निधी (PM Svanidhi) योजना कोरोना व्हायरस महामारीमुळे आपल्या उपजिविकेचे साधन गमावलेल्या फेरीवाले-विक्रेत्यांसाठी, छोट्या व्यवसायिकांच्या मदतीसाठी सुरू केली गेली. या अंतर्गत कामगारांना कोणत्याही हमीशिवाय 10 हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. देशभरात अशा 50 लाख विक्रेत्यांना याचा लाभ देण्याचे लक्ष्य आहे.

रिझर्व्ह बँकेने म्हटले की, पीएम स्वनिधी योजनेंतर्गत पहिल्या आणि दुसर्‍या श्रेणीत केंद्रांमध्ये प्राप्त फेरीवाले-विक्रेत्यांना पीआयडीएफ योजनेचे लाभार्थी बनवले जाईल.
मात्र, आतापर्यंत योजनेंतर्गत तिसर्‍या पासून सहाव्या श्रेणीच्या केंद्रांच्या छोट्या विक्रेत्यांना योजनेचा लाभ मिळत राहील.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | पुण्याच्या विमाननगरमधील हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा; 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

Raj Thackeray | नारायण राणे-शिवसेना संघर्षावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Crime | फोरेक्स ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून 15 लाखाची फसवणूक