PMC Junior Engineer Suspension | भरतीसाठी पैसे उकळणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याचे तडकाफडकी निलंबन, पुणे महापालिकेतील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Junior Engineer Suspension | पुणे महानगरपालिकेच्या पदभरतीत (PMC Recruitment) सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्याने उमेदवारांना नोकरीचे आमिष (Lure of Job) दाखवून पैसे घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात कनिष्ठ अभियंता सूरज पवार (Suraj Pawar) यांना तडकाफडकी निलंबीत (PMC Junior Engineer Suspension) करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या पवार यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त (Deputy Commissioner) सचिन इथापे (Sachin Ethape) यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

पुणे महानगरपालिकेत 488 रिक्त जागांची भरती सुरु केली आहे. ऑनलाइन परीक्षेचा टप्पा पूर्ण झाला आहे. काही पदांचा निकाल जाहीर होऊन कागदपत्रांची पडताळणी (Documents Verification) करण्याचे काम सुरु आहे.
तर काहींचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरु आहे.
या पदांसाठी मोठी स्पर्धा असल्याने सूरज पवार यांनी काही उमेदवाराशी संपर्क साधून पैसे घेण्याचा प्रयत्न केला.
तब्बल 5 ते 10 लाख रुपये मागत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Addl Commissioner Ravindra Binawade) यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रार प्राप्त होताच सूरज पवार याचे निलंबन करुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार बुधवारी इथापे यांनी पवार याच्या निलंबनाचे (PMC Junior Engineer Suspension) आदेश काढले.
पवार यांची सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे (Sinhagad Road Zonal Office) सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड
(Assistant Commissioner Pradeep Awad) यांनी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पवार याची खातेनिहाय चौकशी केली जाणार असून त्याला पूर्व परवानगीशिवाय पुणे महापालिका क्षेत्र सोडता येणार
नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.

Web Title :- PMC Junior Engineer Suspension | suspension of junior engineer for extorting money for recruitment, type in Pune Municipal Corporation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा