PMC Merged Villages | समाविष्ट 34 गावांतील जीएसटी उत्पन्नातील हिस्साच महापालिकेला मिळत नाही; महापालिका स्वतः 360 कोटी रुपये जीएसटी शासनाला भरते

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMC Merged Villages | महापालिकेत 34 गावे समाविष्ट करून काही वर्षे उलटले असले तरी या गावातील जीएसटी उत्पन्नाच्या रकमेतील हिस्सा महापालिकेला मिळत नाही. उलट शासन महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) वतीने करण्यात येणाऱ्या विकासकामांवर देखील 18 टक्के जीएसटी (GST) आकारत आहे. महापालिका दरवर्षी तब्बल दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे करत असून तब्बल 380 कोटी रुपये जीएसटी व अन्य उपकरांपोटी शासनाच्या तिजोरीत जमा करत आहे. याचा थेट परिणाम पुण्याच्या विकासकामांना बसत आहे .(PMC Merged Villages)

देशात 2017 मध्ये सर्व कर रद्द करून जीएसटी ची अंमलबजावणी सुरू झाली. जीएसटी मुळे करचोरीला काही अंशी आळा बसला असला तरी खाद्य पदार्थापासून अगदी मर्तिकेच्या साहित्यावरही जीएसटी आकारणी होऊ लागल्याने महागाईचे चटके बसू लागले आहेत.

जीएसटी आल्यानंतर महापालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील एलबीटी रद्द झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांना त्या शहरातील उत्पन्नाच्या हिश्श्यापोटी राज्य शासनाकडून जीएसटी चे उत्पन्न मिळू लागले. पुणे महापालिकेला देखील आजमितीला सुमारे अडीच हजार कोटी रुपये उत्पन्न जीएसटी तुन मिळत आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक जरी दहा हजार कोटी रुपयांचे असले तरी सात हजार कोटी रुपयेच उत्पन्न मिळते. भांडवली खर्च वगळता जेमतेम दोन हजार कोटी रुपये विकास कामांसाठी उरतात.

या कामांसाठी 18 टक्के जीएसटी भरावा लागतो. दोन टक्के आयकर आणि एक टक्का उपकर असे 21 टक्के कर शासनाच्या
तिजोरीत जातो. थोडक्यात विकास कामांसाठी जेमतेम सोळाशे कोटी रुपये महापालिकेला मिळतात.
त्यामुळे राज्य शासनाकडून महापालिकेला काही प्रकल्पात निधी मिळत असला तरी तो पुणे महापालिकेतून कर रूपाने
घेतलेला पैसाच परत देण्यात येतो, असे वरकरणी दिसत आहे.

महापालिकेमध्ये 2017 मध्ये 11 गावे आणि 2020 मध्ये 23 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
या गावांमध्ये होणाऱ्या जीएसटी उत्पन्नाचा हिस्सा अद्याप महापालिकेला मिळत नाही.
समाविष्ट गावातील जीएसटी उत्पन्नाचा हिस्सा मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे,
अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका का केली?, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितले ‘हे’ कारण

Ajit Pawar | ‘ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार’ शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया