PMPML Bus Driver | पुणे : पीएमपीएमएल बस चालकाने सहकाऱ्याच्या कानाचा तोडला लचका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMPML Bus Driver | गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन पीएमपीएमएल’ बस चालकाने सहकाऱ्याला शिवीगाळ करून हाताने मारहाण करायला सुरुवात केली. तसेच त्याच्या कानाचा लचका तोडला. हा प्रकार फुरसुंगी (Fursungi) येथील भेकराईनगर बस डेपोमध्ये (Bhekrai Nagar Depot) मंगळवारी (दि.19) रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

याप्रकरणी प्रदीप आण्णासो सुतार (वय-41 रा. काळेवाडी, ता. पुरंधर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन कोरे नावाच्या बस चालकावर आयपीसी 325, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(PMPML Bus Driver)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच ठिकाणी काम करता. मंगळवारी रात्री फर्यादी सुतार हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्यावेळी त्यांनी आरोपीला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने कोरे याने फिर्यादी यांना शिवागाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच सुतार यांच्या कानाचा चावा घेऊन कानाची पाळी तोडली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayashree Kawade Suspended | वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडे पुन्हा निलंबित, एसीबीकडून गुन्हा दाखल

Pune Mundhwa Crime | पुणे : ‘मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’, फावड्याच्या दांडक्याने युवकाला बेदम मारहाण

Hinjewadi Crime | कार शोरूमच्या कर्मचाऱ्याकडून पैशांची अफरातफर, हिंजवडी परिसरातील प्रकार