1 एप्रिलपासून ‘या’ बँकेच्या नियमात होणार बदल, त्वरित बँकेशी करा संपर्क

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर आपण पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) ग्राहक असाल तर आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे. येत्या 1 एप्रिलपासून बँकेत काही बदल होणार आहेत ज्यामुळे जुन्या आयएफएससी आणि एमआयसीआर काम करणार नाहीत. 31 मार्चपर्यंत बँकांना त्यात बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजेच 31 मार्च 2021 नंतर हे कोड कार्य करणार नाहीत. जर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला बँकेतून एक नवीन कोड घ्यावा लागेल. तसे न झाल्यास, 1 एप्रिलपासून ग्राहक ऑनलाइन मोडमधून पैशांचा व्यवहार करू शकणार नाहीत. बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.

दरम्यान, पीएनबीमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूबीआय) या दोन सरकारी बँकांचे विलीनीकरण झाले आहे. 1 एप्रिल 2020 पासून हे विलीनीकरण झाले. त्यांचे ग्राहक आता पीएनबीमध्ये दाखल झाले आहेत. या विलीनीकरणानंतर ती सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची बँक बनली आहे. यानंतर आता या बँकांच्या ग्राहकांना नवीन चेकबुक आणि आयएफएससी आणि एमआयसीआर कोड मिळण्यास सांगण्यात आले आहे. पीएनबीमध्ये विलीनीकरणानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या सर्व शाखा आता पीएनबीच्या शाखा म्हणून कार्यरत आहेत. आता बँकेत 11,000 हून अधिक शाखा आणि 13,000 पेक्षा जास्त एटीएम कार्यरत आहेत.

बँकेने टोल फ्री क्रमांक केला शेअर
बँकेने आपल्या ट्विटमध्ये एक टोल फ्री नंबर शेयर केला आहे, जिथे आपण त्यासंदर्भातील सर्व माहितीवर कॉल करू शकता. माहितीसाठी आपण बँकेच्या टोल फ्री क्रमांक 18001802222/18001032222 वर देखील कॉल करू शकता. विलीनीकरणानंतर पीएनबीमध्ये सामील झालेल्या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना आता नवीन चेकबुक आणि नवीन आयएफपएससी कोड मिळणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.