PNB ग्राहकांसाठी खुशखबर ! 30 सप्टेंबरपर्यंत लोनवर लागणार नाही प्रोसेसिंग फी, डॉक्युमेन्टेशन चार्जसुद्धा पूर्णपणे माफ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. पंजाब नॅशनल बँकेने 75व्या स्वातंत्र्य दिनानिमत्त आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर सादर केली आहे. Punjab National Bank (PNB) ने 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ग्राहकांसाठी होम लोनवर प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेन्टेशन चार्ज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत होम लोनवर प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेन्टेशन चार्ज द्यावा लागणार नाही.

PNB 6.80% वर देत आहे होम लोन

पीएनबी यापूर्वी होम लोनच्या 0.50 टक्के प्रोसेसिंग आणि डॉक्युमेन्टेशन चार्ज घेत होती.
परंतु आता कोणताही चार्ज नाही. पीएनबी ग्राहकांना 6.80% वर होम लोन देत आहे.

SBI चा ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस

एसबीआयने सुद्धा ग्राहकांना हाम लोनवर (Home loan) प्रोसेसिंग फी (Processing Fee) माफ केली आहे.
याशिवाय बँकेने सर्व चॅनलवर आपल्या कार लोन ग्राहकांसाठी प्रोसेसिंग फीवर 100 टक्के सूटची घोषणा केली आहे.
ग्राहक आपल्या कार लोनसाठी 90 टक्केपर्यंत ऑन-रोड फायनान्सिंगच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, एसबीआय इतर सवलतीच्या व्याजदरांनी समोर आली आहे.

 

Web Title : pnb home loan offer processing fee and documentation charges free till 30 september

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Court | 118 कोटींच्या अपहार प्रकरणी व्यवसायिक संतोष दोशीचा जामिन फेटाळला, जाणून घ्या प्रकरण

PM Modi | पीएम मोदी सध्या एकवेळ भोजन करत आहेत, स्वत:च सांगितले कारण; पहा व्हिडिओ

Nitin Landge Bribe Case | होर्डिंग लाच प्रकरण : ‘पैसे वर सोळा जणांना द्यावे लागतात’ ! टक्केवारी बाबतच्या आदेशाचे संभाषण ‘रेकॉर्ड’; जाणून घ्या कोर्टातील युक्तीवाद