Police Constable End Life Due To Wife | पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोट जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Police Constable End Life Due To Wife | मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.14) रात्री घडली आहे. विजय साळुखे (वय-38) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी सायनमधील प्रतीक्षा नगर येथे राहत्या घरात गळफास (Hanging CAse) लावून आत्महत्या केली. पत्नीच्या त्रासाला कंटाळून विजय यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून पोलिसांनी जप्त केली आहे. (Policeman Suicide Case)

मिळालेल्या माहितीनुसार, विजय साळुखे सायनच्या प्रतीक्षा नगर येथे राहत होते. मुंबईच्या शाहुनगर पोलिस स्टेशन मध्ये 30 मे रोजी बदली झाली होती. मात्र आजारपणाचं कारण देत त्यांनी सुट्टी घेतली होती. साळुंखे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. मुंबईतील वडाळा टी टी पोलिसांनी साळुंखे यांच्या अपमृत्यूची नोंद केली आहे.(Police Constable End Life Due To Wife)

घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. साळुंखे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली
चिठ्ठी जप्त केली. साळुंखे यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Chandan Nagar Pune Crime News | पुणे: तुमच्यावर मनी लाँड्रींगची केस! चौकशीची भीती घालून सायबर गुन्हेगारांकडून महिलेला 13 लाखांचा गंडा

Sinhagad Express | मोटरमनने वेगमर्यादा न पाळल्याने सिंहगड एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

Harshvardhan Patil On Sugar Export | साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी; हर्षवर्धन पाटलांची कबुली