Police Suspended In Pune | कोथरूड परिसरातील घडलेल्या 4 डिसेंबरच्या ‘त्या’ प्रकरणात वाहतूक पोलीस तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Suspended In Pune | दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेला अडवून तिच्याकडे दहा हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. मात्र, महिलेने दंड भरण्यास असमर्थता दाखवल्यानंतर एका मिनी मार्केट मधील क्युआर कोडवर फोन पे करुन 500 रुपये स्कॅन करुन घेतले. याप्रकरणी कोथरुड वाहतूक शाखेतील (Kothrud Traffic Branch) पोलीस शिपाई संग्राम लक्ष्मण पवार (Police Sangram Laxman Pawar) यांना तकडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. संग्राम पवार यांच्या निलंबनाचे (Police Suspended In Pune) आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar) यांनी मंगळवारी (दि.12) काढले आहेत. ही घटना 4 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नळस्टॉप चौकात घडली होती.

संग्राम लक्ष्मण पवार हे कोथरुड वाहतूक विभागात कार्यरत आहे. 4 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता त्यांची नळस्टॉप येथे वाहतुक नियमन करण्यासाठी त्यांची नेमणूक केली होती. त्यावेळी एक महिला दुचाकीवरुन आली. त्यांना आडवून त्यांच्याकडे दहा हजार रुपये दंड होईल असे सांगितले. यानंतर महिलेने दंड भरण्यास असमर्थता दाखवल्यानंतर त्यांना एका मिनी मार्केट मध्ये जाऊन क्युआर कोड स्कॅन करुन 500 रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने संग्राम पवार यांना पैसे आणून दिले.

कर्तव्य करत असताना बेशिस्त बेजबाबदारपणाचे व पोलीस खात्यास अशोभनिय असे गैरवर्तन केले आहे.
यामुळे संग्राम पवार यांना 12 डिसेंबर पासून शासकिय सेवेतून निलंबित (Police Suspended In Pune) करण्यात
येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. तसेच निलंबन काळात महिन्याचा निर्वाह भत्ता घेण्यापूर्वी कोणत्याही
प्रकारची खासगी नोकरी किंवा धंदा करत नसल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर निर्वाह भत्ता दिला जाईल.
तसेच निलंबन काळात कोणतीही नोकरी किंवा धंदा केल्यास निर्वाह भत्ता रद्द केला जाईल असेही आदेशात नमूद केले आहे.

निलंबन काळात मुख्यालय सोडून जायचे असल्यास पोलीस उपायुक्त, मुख्यालय (DCP HQ Pune) यांची पुर्व परवानगी
घेणे आवश्यक आहेत. तसेच निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय पुणे शहर येथे
हजारी द्यावी लागेल, असेही आदेशात नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भोसरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, डोळा मारुन ओढले मिठीत; तरुणाला अटक

पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार, चार जणांना अटक; सहकारनगर परिसरातील घटना