Policeman Dies In Accident In Pune | अपघातात जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे निधन, पुणे ग्रामीण पोलीस दलात ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून होती ओळख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Policeman Dies In Accident In Pune | यवत पोलीस ठाण्यातील (Yavat Police Station) पोलीस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (Police Sandeep Kadam) (वय-43 रा. बारामती मुळगाव लासुर्णे, ता. इंदापूर) हे पायी जात असताना एका टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली. हा अपघात बारामती-भिगवण रस्त्यावरील हॉटेल अभिषेक समोर शुक्रवारी (दि.22) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कदम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सोमवारी (दि.25) दुपारी कदम यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या मुळगावी लासुर्णे ता. इंदापुर येथे सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. (Policeman Dies In Accident In Pune)

संदीप कदम हे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी घराबाहेर पडले होते. हॉटेल अभिषेक समोरील रस्त्यावरुन ते पायी जात असताना पाठीमागून आलेल्या पिवळ्या रंगाच्या तीनचाकी टेम्पोने कदम यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यात ते रस्त्याच्या एका बाजूला फेकले गेले. त्यामध्ये कदम यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. (Policeman Dies In Accident In Pune)

कदम यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने संदीप कदम यांना पुढील उपचारासाठी उपचारासाठी बारामतीहून पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात हलविले होते. त्यानंतर काल (रविवारी) दुपार पासून त्यांच्यावर बारामती शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज (सोमवार) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. संदीप कदम यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, तीन बहिणी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परीवार आहे.

संदीप कदम हे इंदापुर तालुक्यातील लासुर्णे गावचे रहिवाशी होते. त्यांनी बारामती शहर, जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या
स्थानिक गुन्हे शाखा व लोणी काळभोर पोलीस ठाण्यात यापूर्वी कर्तव्य बजावले आहे. मागील तीन वर्षापासून संदीप कदम
हे यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीत हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
ते यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत असून, त्यांनी आपल्या कौशल्याने अनेक गुन्ह्याची उकल केलेली आहे.

‘स्टाईल आयकॉन’ म्हणून ओळख

संदीप कदम यांना व्यायाम करण्याबरोबच वेगवेगळ्या स्टाईलमध्ये सेल्फी व फोटो काढण्याचा छंद होता.
पोलीस दलातील आपल्या अनेक सहकाऱ्यांबरोबरच त्यांनी आपल्या मुला-मुलीबरोबरचे अनेक फोटो आपल्या फेसबुक
अकाउंटवर शेअर केले आहेत. याशिवाय पोलीस दलातील त्यांची कामगिरी पाहता त्यांना ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून
ओळखले जात होते. संदीप कदम यांच्या निधनाची माहिती मिळताच पोलीस दलातील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना
मोठा धक्का बसला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation – Kunbi Caste Certificate | मराठा आरक्षण व मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत विधिज्ञ व अभ्यासकांची तज्ञ समिती स्थापन; सद्यस्थितीत आंदोलन नव्हे तर कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता, आरक्षण परिषदेत बहुतांश तज्ञांचा सूर