×
HomeशहरअहमदनगरPoliceman Suicide | पोलीस कर्मचाऱ्याची सर्व्हिस रायफल मधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Policeman Suicide | पोलीस कर्मचाऱ्याची सर्व्हिस रायफल मधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

राहुरी : पोलीसनामा ऑनलाइन – मुळा धरणाच्या (Mula Dam) मुख्य गेटवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सर्व्हिस रायफल (Service Rifle) मधून स्वत:वर गोळी (Shooting Himself) झाडून घेत आत्महत्या (Policeman Suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळी पावणे दहाच्या सुमारास राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीच्या खोलीत घडली. भाऊसाहेब दगडू आघाव Bhausaheb Dagdu Aghav (वय-49 रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी – Rahuri) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे (Policeman Suicide) नाव आहे.

आघाव हे नगर येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांना राहुरी तालुक्यातील मुळा धरणावर सुरक्षा रक्षक म्हणून तैनात करण्यात आले होते. आज सकाळी धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीच्या खोलीत आतून दरवाजा बंद करुन पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव यांनी सर्व्हिस रायफल मधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे (Policeman Suicide) कारण समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके
(Sub Divisional Police Officer / DySP Sandeep Mitke), राहुरी पोलीस ठाण्याचे
(Rahuri Police Station) पोलीस निरीक्षक प्रताप दराडे (Police Inspector Pratap Darade),
तहसीलदार फसियोद्दीन शेख (Tehsildar Fasiouddin Sheikh), जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी
घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी
घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.

Web Title :- Policeman Suicide | policeman suicide shooting himself service rifle Rahuri Police Statio ahmednagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Minor Girl Rape Case | जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार; सिंहगड रोड परिसरातील घटना

Satara Police | लाच प्रकरणी सातारा पोलीस दलात खळबळ, सहायक पोलीस उपनिरीक्षकाची पदावनती करुन पुन्हा केलं हवालदार

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News