Porn films case | उद्योजक राज कुंद्राच्या WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासे, या प्रकारचे झाली होती सुरूवात

 पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Porn films case | अश्लिल चित्रपट चित्रीत (Porn films case) करण्याच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला (Raj Kundra) अटक केली आहे. राज कुंद्रावर फक्त सॉफ्ट पॉर्न फिल्म (Soft porn movie) तयार करण्याचे नाही तर व्हिडिओ ऍपवर अपलोड करण्याचे देखील आरोप करण्यात आले आहे. पोलिसांचा असा दावा आहे की राज कुंद्राने त्याच्या एका नातावाईकासोबत यूकेमध्ये कंपनी तयार केली आणि ही कंपनी पॉर्न चित्रपटांसाठी एजेन्ट्सला कॉन्ट्रॅक्ट द्यायची.

या प्रकरणात आता राज कुंद्राचे (Raj Kundra) चॅट चव्हाट्यावर आले आहे.
या चॅट्समध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षीशी हॉटशॉट्स डिजिटल ऍप्लिकेशन मिळविण्याविषयी बोलत आहेत.
तसेच रेव्हेन्यूबाबत आणि फाईल कशी पाठ्वण्याबाबत चॅटिंग झाल्याचं या चॅटमधून हे उघडकीस आले आहे. याबाबत एका व्हाट्सऍप (WhatsApp) ग्रुपचा खुलासा झाला आहे.
या व्हाट्सऍप ग्रुपचं नाव ‘H Accounts’ असं आहे. या ग्रुपमध्ये मेघा व्हियान खाती, प्रदीप बक्षी, रॉब डिजिटल मार्केटिंग हॉटशॉट्स आणि रॉय इव्हान्स कंटेंट हेड हॉटशॉट्स (Head hot shots) हे देखील सामील आहेत.
पोलिसांना ग्रुपमध्ये होणाऱ्या चॅटबद्दल माहिती मिळाली आहे.
ज्यात रेव्हेन्यूबद्दल बोलत असल्याचं दिसून येत आहे.
शिवाय पोर्नोग्राफीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला किती पैसे द्यायचे आहेत,
हे देखील चॅटमध्ये दिसत आहे.

हे WhatsApp चॅट्स (Chats) ऑक्टोबर 2020 रोजी आहेत.
या चॅट्सवरून असे दिसून आले आहे की, ऍपला दररोज थेट शोद्वारे 1.85 लाख रुपये आणि सिनेमांकडून दिवसाला 4.53 लाख रुपये मिळकत होती.
त्यावेळेस अश्लील कॉन्टेन्ट असलेल्या हॉटशॉट्सचे वीस लाख स्बस्क्रायबर होते.
तसेच, या चॅटमध्ये राज कुंद्रा (Raj Kundra), प्रदीप बक्षी (Pradeep Bakshi)
यांच्याशी शोच्या कलाकारांच्या थकबाकी लवकरात लवकर भरण्यासाठी सुद्धा बोलत आहेत.
राज कुंद्राने बक्षी यांना म्हटलं की, लाईव्ह करणाऱ्या प्रिया सेनगुप्ता (Priya Sengupta) हिला पैसे मिळालेले नाहीत आणि ते त्वरित देण्यात यावे.
10 ऑक्टोबरच्या चॅटमधून असा खुलासा झाला की,
एकूण 81 कलाकारांनी वेळेवर पैसे न मिळाल्याबद्दल तक्रारी केल्या आहेत.
असं समोर आलं आहे.

Web Title : Porn films case | raj kundra arrest front raj kundras whats app chat thats how business started

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra cabinet reshuffle | राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे; काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना डच्चू?

Pune Fire | पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील वंडरलँड बिल्डिंगच्या समोरील इमारतीच्या बेसमेंटमधील साहित्याला आग

Income Tax Department | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निकटवर्तीय अधिकारी आयकर विभागाच्या ‘रडार’वर