Porsche Car Accident Pune | बिल्डर विशाल अगरवाल कुटुंबियांकडून कल्याणीनगर अपघात प्रकरणात गरीब ड्राइव्हरला अडकविण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर येथे बिल्डर विशाल अगरवाल (Vishal Agarwal Builder) याच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातामुळे दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात अनिश अवधिया (Aneesh Awadhiya) आणि अश्विनी कोस्टा (Ashwini Costa) यांचा जीव गेला. (Kalyani Nagar Accident)

या प्रकरणात पोलिसांनी दिरंगाई करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar MLA) यांनी केला आहे. सदर अल्पवयीन मुलगा अति वेगात गाडी चालवत असताना हा मृत्यू होऊनही अगदी साधी कलमे लावली ज्यामुळे काही अटींसह एका दिवसात अल्पवयीन मुलाचा जामीन झाला.(Porsche Car Accident Pune)

या घटनेनंतर राज्य तसेच देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारण्यात येऊ लागले. दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यात काही कलमाची वाढ करत पुन्हा अल्पवयीन आरोपीला कोर्टासमोर सादर केल्यांनतर कोर्टाने संबंधित मुलाला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले.

तसेच अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल
(Surendra Kumar Agarwal) यांच्यावर एका प्रकरणात छोटा राजनशी (Chhota Rajan) हातमिळवणी करून
गोळीबार गेल्याचा आरोप असल्याने पोलीस त्याचीही चौकशी करीत आहेत.

ही सर्व चौकशी सुरु असताना संबंधित घडलेल्या अपघातामध्ये आपला अल्पवयीन मुलगा गाडी चालवत नव्हता तर
ड्राइव्हर गाडी चालवत होता असे वडील विशाल अगरवाल यांनी म्हंटले आहे तर अल्पवयीन मुलाच्या चौकशी दरम्यान
मुलानेही तीच रीघ ओढत अपघातावेळी मी वाहन चालवत नसून ड्राइव्हर गाडी चालवत असल्याचे म्हंटले आहे.

अपघात घडल्यानांतर त्याठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी अल्पवयीन मुलगा पळून जात असताना त्याला चांगलाच चोप दिला होता.
त्यावेळी त्याने मद्यपान केले असल्याचे व तो अल्पवयीन मुलगाच वाहन चालवीत बसल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले होते.

अपघातावेळी नेमके वाहन कोण चालवत होते हे चौकशी दरम्यान पुढे येईलच मात्र आता गरीब ड्राइव्हरला या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न अगरवाल कुटुंबियांकडून होत असल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी अगरवालच्या घराची , पब ची तसेच अपघातातील वाहन ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्याठिकाणची चौकशी
पोलीस करीत आहेत. दरम्यान सीसीटीव्ही (CCTV Footage) पाहीले जात आहेत.

गाडीची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी केली जात आहे. ड्राईव्हर चा जबाब नोंदविण्यात आला आहे.
यात मुलाने जेव्हा गाडी चालवण्यास मागितली तेव्हा ड्राईव्हर ने मालकाला फोन करून त्याबाबत विचारणा केली होती.
यावर त्यांनी आपल्या मुलाला गाडी चालवायला देण्यास सांगितली होती असा जबाब नोंदविण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलाचा कथित व्हिडीओ व्हायरल, आई शिवानी अगरवाल यांनी समाजमाध्यमांसमोर येऊन दिले स्पष्टीकरण (Video)

CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : आतापर्यंतच्या कारवाईची पोलीस आयुक्तांनी दिली माहिती, गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला, चौकशीत समोर आले

Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातात बिल्डर विशाल अग्रवाल आणि आरोपी मुलाचा नवा दावा, ”अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता”