Pradeep Sarkar Pass Away | दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे अल्पशा आजाराने निधन

पोलीसनामा ऑनलाईन : सिनेदिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे आज पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन (Pradeep Sarkar Pass Away) झाले आहे. ते 68 वर्षांचे होते.प्रदीप सरकार यांनी आपल्या कारकिर्दीत परिणीता, लागा चुनरी में दाग, मर्दानी आणि हेलिकॉप्टर ईला या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मागच्या काही दिवसांपासून ते डायलिसिसवर (Dialysis) होते आणि त्यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी खूपच कमी झाली होती. (Pradeep Sarkar Pass Away)

आज पहाटेच्या सुमारास अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पहाटे 3 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सरकार यांच्या निधनाची बातमी कळताच सिनेसृष्टीतील त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

अभिनेत्री नीतू चंद्रा (Actress Neetu Chandra) यांनी प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांच्या
निधनाची बातमी दिली. प्रदीप सरकार हे अभिनेत्री नीतू चंद्रा यांचे पहिले दिग्दर्शक होते,
तिने महाविद्यालयात असतानाच एका फुटवेअर ब्रँडच्या जाहिरातीसाठी त्यांच्याबरोबर काम केले होते.
नीतू आणि सरकार यांची बहीण मधु या खूप जवळच्या मैत्रिणी होत्या.
प्रदीप सरकार यांच्या अकाली निधनामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.