Pradeep Sharma | लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pradeep Sharma | चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना लखन भैया चकमक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवणारा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवले आणि इतर दोषीप्रमाणेच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तीन आठवड्यांत शर्मा यांना मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे निर्देश दिले आहेत.(Pradeep Sharma)

2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी या 2006 मध्ये दाखल केलेल्या 16 अपीलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता.

वसईत राहणाऱ्या रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया विरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी लखन भैय्याचं पश्चिम मुंबईतील वर्सोवा येथे एन्काऊंटर झालं होतं. या इन्काऊंटरचं नेतृत्व माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी केले होते. ही एक कथित बनावट चकमक असल्याचा आरोप करत लखन भैयाच्या भावाने याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने एसआयटी स्थापन करुन या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
लखन भैया एन्काउंटर बनावट असल्याचे एसआयटी चौकशीत उघड झालं होतं.
याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील 13 अधिकारी आणि पोलिसांना अटक केली होती.
त्यात प्रदीप शर्मा यांचाही समावेश होता. त्यानंतर 2008 मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते.
परंतु न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. शर्मा हे 1983 च्या बॅचचे अधिकारी असून 2020 मध्ये निवृत्त
होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला. मात्र, राजकारणात त्यांना यश आले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMRDA News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचे आवाहन

Pune News | आगामी काळात रा.स्व. संघ ‘पंच परिवर्तन’ सूत्रावर आधारित काम करणार – प्रांत संघचालक प्रा. सुरेश जाधव

Chakan Firing Case | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार, चाकण परिसरातील घटना