Prakash Ambedkar On Maha Vikas Aghadi | प्रकाश आंबेडकरांची मविआतील प्रस्तापितांवर नाराजी, ”तिघे आधी चर्चेला बसतात, नंतर वंचितला बोलवतात, आम्ही उपरे…”

नागपूर : Prakash Ambedkar On Maha Vikas Aghadi | महाविकास आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्या त्यात ३ पक्ष चर्चेला बसतात. त्यांची चर्चा झाल्यानंतर वंचितला बोलवतात. आम्ही वंचित आहोत, उपरे आहोत. बैठकीतील चर्चेत बोलवल्यावर सहभागी होतो. बैठक सुरू असते तेव्हा आम्ही बाहेर बसलेलो असतो. मी राजकीय वस्तूस्थिती मांडतोय, अशा शब्दा वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, माझ्याकडे ४८ उमेदवार आहेत. गेल्यावेळी काँग्रेस-भाजपाने आमचे नुकसान केले, मुस्लीम मतदार त्यांच्याकडे गेले. दलित-मागासवर्गीय मतदार आमच्याकडे वळले. त्यामुळे गरज ओळखून जागावाटपाची चर्चा करा. आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करू .(Prakash Ambedkar On Maha Vikas Aghadi)

आंबेडकर म्हणाले, आम्हाला २ मतदारसंघात ताकद उभी करता आली नाही. ४६ मतदारसंघात ताकदीने आहोत. अडीच लाखाच्या आसपास मते आमच्याकडे आहेत. भाजपाला टार्गेट आमच्याशिवाय कुणी करत नाही. ज्या दिवशी मी जाहीर करेन तेव्हा लक्षात येईल.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आघाडी झाली नाही तर आम्ही २७ मतदारसंघात फोकस करणार होतो ती यादी त्यांना दिली.
आता त्यांनी कळवायचे आहे. ३० वर्षाचे राजकारण हे तडजोडीचे होते. कुणी कुठे लढायचे हे फिक्स होते. ज्या मतदारसंघात ते लढले तिथे त्यांची ताकद आहे.

आज शिवसेना ठाकरे-राष्ट्रवादी शरद पवार केवळ नोंदणीकृत पक्ष आहे. परंतु त्यांना ओळख निर्माण करायची आहे.
त्यासाठी ठराविक मते आणि लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. त्यामुळे ही गरज त्यांची आहे तशी आमचीही आहे.
त्या गरजेला ओळखून वाटाघाटी झाल्या पाहिजेत, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, ठाकरेंचे मतदार काँग्रेसकडे वळतील का याबाबत सांशकता आहे.
हा मतदार आमच्यापेक्षा भाजपाकडे वळू शकतो ही काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे मी आघाडीत राहावे असं काँग्रेसला वाटते.
मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन. आम्ही किमान ६ जागा जिंकू शकतो. आमचा राजकीय अजेंडा नाही.
सामाजिक परिवर्तन हा आमचा अजेंडा आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी जागरुक झाला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीने आतापर्यंत निजामी मराठ्यांची पाठराखण केली.
हा जागरुक झालेला ओबीसी भाजपाच्या दिशेने जाऊ शकतो. हे होऊ द्यायचे नसेल तर, आघाडीत किमान १५ उमेदवार
ओबीसी हवेत. भाजपा विशेषत: अल्पसंख्याकांना वगळून राजकारण करते.
त्यामुळे यादीत किमान ३ उमेदवार अल्पसंख्याक असावे, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shikhar Bank Scam Case | अजितदादा सत्तेत इन, तपास आऊट, शिखर बँक घोटाळ्याचा तपास बंद करा; पोलिसांची कोर्टाला विनंती

Dabholkar Murder Case | डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी ‘सनातन’च्या राष्ट्रीय प्रवक्त्यांचे महत्वाचे वक्तव्य, ”आम्हाला अडकवण्याचा…”

Pune Mundhwa Police | दुचाकीस्वाराला भररस्त्यात मारहाण करुन लुटले, दोघांना मुंढवा पोलिसांकडून अटक

BJP-Shivsena Seat Sharing In Lok Sabha Elections | जागावाटपावरून महायुतीत तणाव, शिंदे गटाचा संताप, सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय?

Pune Lonavala Mega Block | पुणे – लोणावळा लोकल मार्गावर उद्या मेगाब्लॉक, जाणून घ्या रद्द झालेल्या गाड्यांची यादी