Pravin Tarde | “मराठीमध्ये मी हंबीरराव, प्रतापराव करत असेल तर हिंदीमध्ये मी फुटकळ भूमिका का स्वीकारु, लवकरच दाक्षिणात्य सिनेमामध्ये करणार काम” – अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील एक दमदार अभिनेते व दिग्दर्शक अशी ओळख निर्माण करणारे प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे त्यांची मते नेहमी परखडपणे मांडताना दिसतात. चित्रपटाविश्वाविषयीचे त्यांचे प्रेम व कामाविषयीचा प्रामाणिकपणा हा नेहमी दिसून येतो. अभिनेते म्हणून प्रवीण तरडे यांनी अनेक भूमिका गाजवल्या आहेत तसेच दिगदर्शक म्हणून एका मागून एका सुपरहिट चित्रपट देत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चित्रपट बनवताना ते नेहमी व्यवसायिक दृष्टीकोनातून बनवतात असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. आता मराठी चित्रपटांची स्पर्धा कांतारा, पुष्पा सारखे सिनेमे बनवणाऱ्या तसेच हिंदीमधील संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबत आहे असे मत प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी मांडले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते प्रवीण तरडे व त्यांची पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडे (Snehal Tarde) यांनी त्य़ांची चित्रपट विश्वाबद्दलची मते मांडली आहेत. दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांनी ‘देऊळ बंद’ (Deool Band) , ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern), ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao), ‘धर्मवीर’ (Dharmaveer) असे एकामागोमाग एक हिट चित्रपट दिले. अभिनेते म्हणून त्यांनी अनेक भूमिकांना न्याय दिला आहे. मराठी चित्रपट व त्यांना इतर भाषिक सिनेविश्वाकडून असणारी स्पर्धा याबद्दल त्यांनी मत व्यक्त केली. प्रवीण तरडे म्हणाले की, मराठी चित्रपट आता ‘भावनिक कार्ड’वर चालवून उपयोग नाही, तर या स्पर्धेत पूर्ण ताकदीनं उतरायला हवं, चित्रपटगृहचालक आपला सिनेमा घेण्यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजेत, यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे.’ असे मत त्यांनी मांडले.

पुढे ते म्हणाले की, मुळात हिंदी सिनेमाचा प्रेक्षक 80 टक्के आणि मराठी सिनेमाचा 20 टक्के असं प्रेक्षक गणित असलं, तरी आता यापुढे चित्रपटांचा दर्जा महत्त्वाचा ठरणार आहे. असा चित्रपट तयार करा की, जगाने दखल घ्यावी. ‘मुळशी पॅटर्न’चा झाला ना चौदा भाषांत रीमेक? व्यवसाय करताय, तर भावना कशाला? आपल्याबरोबर आता ‘बाहुबली’, ‘कांतारा’, भन्साळींचा चित्रपट, हॉलिवूड अशी स्पर्धा असेल, तर त्या स्पर्धेत निर्भिडपणे उतरायला हवं. आपल्या विषयातही तितकीच धमक पाहिजे. चांगल्या आशयाला कुणीही दाबू शकत नाही. ‘भावनिक कार्ड’ घेऊन सतत खेळत बसण्यापेक्षा व्यावसायिक गणितांचा विचार करा.’

चित्रपटांकडे व्यवसायाच्या दृष्टीने बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन त्यांनी स्पष्टपणे मांडले. यावेळी त्यांनी निर्मात्यांची (Flim Producer) देखील बाजू मांडली. छंद म्हणून चित्रपट तयार करु नयेत. चित्रपट हा व्यवसायच आहे, तो छंद असू शकत नाही. दिग्दर्शकाला व्यावसायिकता जपता आली पाहिजे. माझ्या मनातल्या कलेसाठी मी इतरांचा पैसा घालवू शकत नाही. तिथे स्वतःचे पैसे लावावेत. असे मत त्यांनी मांडले.

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना हिंदी चित्रपटाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी त्यांनी मराठी सिनेमे हे नेहमीच आशयाचे मजबूत असतात असे सांगितले.
तसेच ते म्हणाले की, आपल्याबरोबर आता ‘बाहुबली’(Baahubali), ‘कांतारा’ (Kantara), भन्साळींचा चित्रपट,
हॉलिवूड (Hollywood) अशी स्पर्धा असेल, तर त्या स्पर्धेत निर्भिडपणे उतरायला हवं. आपल्या विषयातही तितकीच धमक पाहिजे. चांगल्या आशयाला कुणीही दाबू शकत नाही.

हिंदी चित्रपटांमध्ये का भूमिका साकारत नाही असा प्रश्न विचारल्यावर प्रवीण (Pravin Tarde) म्हणाले की,
“अनेक हिंदी चित्रपटांतही अभिनयासाठी विचारणा होते. मला मात्र नाही म्हणायला मज्जा येते;
कारण तिथे जाऊन मी कोणत्या भूमिका करू? मराठीत मी ‘हंबीरराव’ असेन, मांजरेकरांच्या चित्रपटात ‘प्रतापराव’ असेन,
एस. एस. राजामौलींशी संबंधित लोकांबरोबर काम करीत असेन, तर फुटकळ भूमिका कशासाठी करायच्या? दक्षिणेत मी
आता एक भन्नाट चित्रपट (Pravin Tarde In South Movie) करतोय, त्याची लवकरच घोषणा होईल.
तिथे चांगलं काम मिळाल्यानं मी एका पायावर तयार झालो.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics Chief Minister | मुख्यमंत्री पदामध्ये कुठलाही बदल होणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार; अजित पवारांच्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितले (व्हिडिओ)