Prevail Electric | प्रीव्हेल इलेक्ट्रिक 3 नव्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स लॉन्च करण्याच्या तयारीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील आघाडीचे इलेक्ट्रिक (Prevail Electric) वाहन उत्पादक प्रीव्हेल इलेक्ट्रिक हे ऑटोमोटिव्ह सोल्युशन प्रदान करणारे स्टार्टअप असून, त्याने इलाइट, फाइनेस आणि वुल्फरी या तीन प्रीमियम मॉडेल स्कूटर लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. वाढत्या भारतीय इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात सुधारणा करत ई-वाहनांची वाढती मागणी पूर्ण करण्याची ब्रँडची इच्छा आहे. किफायतशीर आणि नूतनीकरणयोग्य पर्यायांचे मिश्रण असलेले तंत्रज्ञानाचे संपूर्ण सोल्युशन प्रदान करत ग्राहकांना वाहन चालवण्याचा उत्कृष्ट अनुभव याद्वारे दिला जाईल.

इलाइट : ही स्कूटर कमाल २०० किलो वजनाकरिता ताशी ८० किमीचा सर्वोच्च वेग देते. लिथियम-आयन बॅटरी, बदलता येणारे बॅटरी पर्याय असलेली ही स्कूटर एका चार्जवर ११० किमी रेंजपर्यंत जाऊ शकते. एकदा बॅटरी ड्रेन झाल्यावर ती ४ तासात पूर्णपणे चार्ज होऊ शकते. हे मॉडेल १००० आणि २००० व्हॉट्स मोटर पॉवरसह येते. हे मॉडेल ५५ए कंट्रोलर मॉडेलसह येते व यात वन-क्लिक फिक्स फंक्शनही असते. या वाहनात लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) स्क्रीन असून ती प्रामुख्याने दिशादर्शन, कंट्रोल आणि मनोरंजनाच्या उद्देशासाठी वापरली जाते. ही स्कूटर १२९,९९९/- रुपयांत उपलब्ध आहे.

फाइनेस : ही स्कूटर कमाल २०० किलो वजनासाठी ताशी ६० किमीची टॉप स्पीड देते. लिथियम-आयन बॅटरीद्वारे स्कूटर सिंगल चार्जमध्ये ११० किमी रेंज जाऊ शकते. ४ तासात ती ० ते १०० टक्के चार्जिंग टाइम घेते. यात बदलता येण्याजोगे बॅटरीचे पर्याय आहेत. या मॉडेलमध्ये १२-ट्यूब ब्रशलेस कंट्रोलरसह वन-क्लिक फिक्स फंक्शनचे कंट्रोल मॉडेल येते. ही स्कूटर ९९,९९९/- रुपयांत उपलब्ध आहे.

वुल्फरी: ही स्कूटर वुल्फरी कमाल २०० किलो वजनासाठी ताशी ५० किमी एवढी सर्वाधिक स्पीड देते. लिथियम बॅटरी असलेली ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये ११० किमीची रेंज देते. पूर्णपणे चार्ज होण्यासाठी हे मॉडेल ४ तास घेते. हे मॉडेल १२-ट्यूब ब्रशलेस कंट्रोलरसह वन-क्लिक फिक्स फंक्शनसह येते. ही स्कूटर ८९,९९९/- रुपयांत उपलब्ध आहे.

प्रीव्हेल इलेक्ट्रिकचे (Prevail Electric) सीईओ हेमंत भट्‌ट (Hemant Bhatt) म्हणाले, “अनेक महिने संशोधन आणि विकासानंतर, अखेरीस आम्ही नवे स्कूटर मॉडेल लाँच करण्यासाठी सज्ज आहोत. नवी पिढी त्यांच्या पूर्वजांपेक्षा वातावरण बदल आणि जागतिक तापमान वाढीसाठी अधिक सजग आहे. त्यामुळे ते अधिक शाश्वत, पण किफायतशीर पर्यायाची निवड करत आहेत. आमच्या ब्रँडच्या नव्या स्कूटर्स प्रीमियम सुविधा आणि कौतुकास्पद गती प्रदान करतात. याद्वारे भारतातील ई-मोबिलिटी क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी त्या सज्ज आहेत.”

सोयीसाठी तयार केलेल्या प्रीव्हेल इलेक्ट्रिकच्या स्कूटर्स ग्राहकांना मोबाइल फोन चार्ज करण्याचीही सुविधा पुरवतात.
स्कूटर चालवताना बिल्ट-इन मोबाइल चार्जिंग पोर्ट्सवर ते चार्ज करता येतात.
सर्व तीन मॉडेल्स तब्बल तीन वर्षांच्या वॉरंटीसह येतात आणि ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर सेवा स्वीकारतात.
वाहनांमध्ये ३० डिग्रीने चढण्याची क्षमता असून धक्का टाळण्यासाठी त्यात हायड्रॉलिक डँपिंगची सुविधा आहे.
याद्वारे एकूणच वाहन चालवण्याचा अनुभव तुलनेने आरामदायक ठरतो.
तसेच, ही वाहने एलईडी हेडलाइटला सपोर्ट करतात आणि फाइव्ह-स्पीड चेंज पर्यायाची सुविधाही देतात.

Web Titel :- Prevail Electric | 3 new prevail electric scooters in india unveiled launch in july marathi news

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fire at CBI office । दिल्लीतील CBI मुख्यालयाला आग; अधिकारी बाहेर पळाले, 5 अग्निशमन गाड्या दाखल

Sanjay Raut | नारायण राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी; राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, ₹ 8,750 स्वस्त झाले सोने, जाणून घ्या दर

प्रकृती बिघडल्याने खडसेंची पत्रकार परिषद रद्द ! ईडीच्या चौकशीला हजर राहणार काय याकडे लक्ष