Prithvi Shaw | IPL सुरु असताना पृथ्वी शॉला मोठा धक्का, सपना गिल मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल, तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवरही FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएल (IPL-2023) सुरु होऊन काहीच दिवस झाले असताना दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार खेळाडू पृथ्वी शॉवर (Prithvi Shaw) तक्रार दाखल करण्यात आली आहे. सपना गिलने (Sapna Gill) त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार (FIR) दिली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष सुरेंद्र यादव (Ashish Surendra Yadav) यांच्या विरोधात सपनाने तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 354, 509,324 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे अंधेरी कोर्टाने (Andheri Court) आदेश दिले होते.

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि आशिष यादव यांच्याविरुद्ध विनयभंग (Molestation) आणि बॅटने मारणे यासह अनेक प्रकरणासह सपना गिलने तक्रार दिली आहे. इतकेच नाही तर तिने तक्रार नोंदवताना सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्रही (Medical Certificate) दिले आहे. यामध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा उल्लेख आहे. तसेच सपना गिल हिची तक्रार ने घेणाऱ्या विमानतळ पोलीस ठाण्यातील (Airport Police Station) अधिकारी सतीश कवनकर (Satish Kavankar) आणि भागवत गरंडे (Bhagwat Garande) यांच्याविरुद्ध आयपीसी 166A अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सपना गिलने पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीच्या काचा फोडल्याचा आरोप आहे.
त्यानंतर अभिनेत्री सपना गिलला पोलिसांनी अटक केली होती. सपना नंतर जामिनावर (Bail) बाहेर आली होती.
त्यानंतर तीने कोर्टात धाव घेतली.
तिने अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात पृथ्वी शॉ विरोधात तक्रार दाखल केली आणि त्याच्या मित्रावर
गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गिल हिने दाखल केलेल्या तक्रारी प्रकरणी 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

Web Title :- Prithvi Shaw | sapna gill file complaint against prithvi shaw ipl 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | जाहिर सभेत आदित्य ठाकरेंचं भाकीत, म्हणाले- ‘हे सरकार काही तासांचे’

Devendra Fadnavis | जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस