Prithviraj Chavan : ‘मोदी सरकारच्या चुकांची किंमत देशाला मोजावी लागतेय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशात बिकट अवस्था निर्माण झाली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या आरोग्य सचिवांच्या पत्रकार परिषदेचा हवाला देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेने जी स्थिती निर्माण झाली आहे. त्याला सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार असल्याच म्हंटल आहे. आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषदेत भारतात वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अत्यंत सुस्थितीत आहे. गेल्या दहा महिन्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही, अस म्हंटल्याचही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी देशत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली होती. त्यावरूनही चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. आरोग्यमंत्र्यांनी केंद्र शासनाने देशभरातील ३९० दवाखान्यात PSAपद्धतीचे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट उभारण्याचे नियोजन केले आहे. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता १ लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. असे सांगितले होते. त्यामुळे १ लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयात सुरु करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु, त्यापुढे सरकारने ती कार्यान्वीत न केल्याने अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णालये रुग्णांना दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करत आहेत. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे प्राण गेले. दिल्लीत ऑक्सिजन मिळवण्यासाठी खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. असे एकूण विदारक परिस्थिती असून केंद्र सरकारने काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असेही चव्हाण यांनी सांगितले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी विचालेले प्रश्न
ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत आपण अत्यंत सुस्थितीत आहोत, हा दावा आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारावर केला होता?
१ लाख मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयातीचे काय झाले?
५ महिन्यात ते का आयात केले नाही? ही प्रक्रिया कोणी थांबवली?
आतापर्यत देशभरात मंजूर केलेल्या १६२ PSA पद्धतीचे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट पैकी फक्त ३३ दवाखान्यातच उभा केले आहेत, हे खरे आहे का?

जानेवारीत जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने कोरोनाला कसे हरवले असे सांगत स्वत:चीच पाट थोपटून घेतली. मात्र, आता हे अंगलट आले आहे. भारतातून येणाऱ्या विमानांन ५० पेक्षा अधिक देशांनी बंदी घातली आहे. सरकारकडून झालेल्या अक्षम्य चुका आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. ऑक्सिजनसाठी देशाला हात पसरण्याची वेळ आली असून या दुरावस्थेला जबाबदार असलेले आरोग्य मंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.