‘भाईजान’ सलमान अन् ‘खिलाडी’ अक्षयला मागे टाकत ‘देसी गर्ल’ प्रियंकानं मारली बाजी ! ‘या’ बाबतीत ठरली ‘अव्वल’

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊटफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. आता ब्रँड व्हॅल्युच्या शर्यतीत प्रियंकानं अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमन खान (Salman Khan), आमिर खान (Aamir Khan) अशा बड्या कलाकारांना मागे टाकलं आहे.

ऑनालईन सेंटीमेंट अ‍ॅनलिसिस कंपनी चेकब्रँड (Checkbrand) नं याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या कंपनीच्या अहवालानुसार प्रियंकाची ऑगस्ट ते ऑक्टोबर मधील ब्रँड व्हॅल्यु ही 2.65 अब्ज सर्वाधिक आहे. या यादीत अक्षय कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेकब्रँड या कंपनीनं ऑगस्ट ते ऑक्टोबर 2020 या 3 महिन्यातील 26 भारतीय फिल्म स्टार्सचे सोशल मीडिया प्रेजेंस आणि डिजिटल एंगेजमेंटचा अभ्यास केला.

प्रियंकानंतर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या अक्षय कुमारची ब्रँड व्हॅल्यु 2.60 अब्ज रुपये आहे. सलमान खानची ब्रँड व्हॅल्यु 2.52 अब्ज आहे, तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या नंबरवर असणाऱ्या दीपिका पादुकोणची ब्रँड व्हॅल्यु ही 2.11 अब्ज आहे. पाचव्या नंबरवर असणाऱ्या शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यु 2.09 अब्ज आहे.

सोशल मीडिया एंगेजमेंट मध्ये सलमान खान नंबर 1

सोशल मीडिया एंगेजमेंटच्या बाबतीत सलमान खान आघाडीवर दिसत आहे. त्याची एंगेजमेंट ही 2.25 लाख आहे. शाहरुखची 2.16 लाख, अक्षयची 1.7 लाख, अजय देवगणची 0.64 लाख आणि अमिताभ यांची 0.62 लाख एवढी आहे.

सर्वाधिक ट्रेडिंग स्टार्स

युट्युब, गुगल आणि ट्विटर सर्चच्या विश्लेषणानंतर सर्वात ट्रेंडिंग स्टार्सच्या यादीत अ‍ॅक्ट्रेस कृती सेनन हिनं बाजी मारली आहे. गेल्या तीन महिन्यात कृती सेनन सर्वाधिक ट्रेंडमध्ये होती. यानंतर दुसऱ्या स्थानावर प्रियंका चोपडा आणि तिसऱ्या स्थानावर आलिया भट होती. यानंतर अनुक्रमे अक्षय कुमार, सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान ट्रेंडमध्ये असल्याचं दिसून आलं.