Priyanka Chopra | ‘सिटाडेल’ वेब सिरीजमधील प्रियंका चोप्राचा फर्स्ट लूक आउट; फर्स्ट लूक पाहून चाहत्यांनी केले भरभरून कौतुक

पोलीसनामा ऑनलाइन : अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या (Priyanka Chopra) ‘सिटाडेल’ या वेब सिरीजची आतुरता होती. आता सिटाडेलमधील प्रियांकाची पहिली झलक समोर आली आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री गुप्तहेरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर येत्या 28 एप्रिलला या सिरीजच्या पहिल्या दोन भागांचा प्रीमियर होणार आहे. सिटाडेल मधील प्रियंकाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियंकाने (Priyanka Chopra) तिचा फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले “सिटाडेल ही वेब सिरीज प्राईम व्हिडिओवर पाहता येईल” प्रियंकाचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडल्याचे दिसत आहे.

प्रियंकाने तिचा फर्स्ट लूक शेअर करताच अनेकांनी त्यावर कमेंट केले आहेत. “कमाल”, “नेहमीप्रमाणे धमाका करण्यास प्रियंका सज्ज”, “प्रियंकाच्या नव्या भूमिकेसाठी उत्सुक” अशा एक ना अनेक कमेंट सध्या तिच्या या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. अनेकांनी तिच्या या लुक वर लाईकचा वर्षाव देखील केला आहे. या वेब सिरीज मध्ये प्रियांका (Priyanka Chopra) सोबत रिचर्ड मॅडन, लेस्ली मॅनविल आणि स्टॅनली टूची यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या सिरीज मध्ये प्रियांका एका गुप्तहेरच्या भूमिकेत दिसणार आहे. नादिया असे तिच्या पात्राचे नाव आहे. प्रियांका या वेब सिरीज मध्ये ॲक्शन आणि रोमँटिक अशा दोन्ही अंदाजात दिसणार आहे. प्रेक्षकांना सायन्स फिक्शन ड्रामा या वेब सिरीज मध्ये पाहायला मिळणार आहे. या वेब सिरीजची निर्मिती 236 मिलियन डॉलर मध्ये करण्यात आली आहे. ही वेब सिरीज 6 भागांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आता प्रेक्षक या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

प्रियंकाच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास सिटाडेल या वेब सिरीज नंतर ती ‘लव्ह अगेन’ या रोमॅंटिक,
विनोदी सिनेमात ह्यूगन आणि सेलीन डायोनसोबत दिसणार आहे. एवढेच नाही तर ती फरहान अख्तरच्या
‘जिले जरा’ या सिनेमात देखील झळकणार आहे. या सिनेमात प्रियंका सोबत कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट
देखील दिसणार आहेत.

Web Title :-  Priyanka Chopra | priyanka chopra shares first look of citadel web series character nadia

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | शासकीय अधिकारी तरुणीवर ओळखीतून केला अत्याचार; अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले १६ लाख ८६ हजार

Maharashtra Budget Session 2023 | गळ्यात कांद्याची माळ, डोक्यावर टोपली; विधिमंडळाबाहेर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी (व्हिडिओ)

Sachin Tendulkar | वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांचा उभारणार पुतळा; मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय