Professor Vedkumar Vedalankar | मराठी सारस्वताचा मानबिंदू असणारी ‘ज्ञानेश्वरी’ आता हिंदी भाषेत अनुवादित होणार

औरंगाबाद न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Professor Vedkumar Vedalankar | मराठीपणाची अशी सांस्कृतिक उंची अन्य भाषांमध्ये पोहोचली पाहिजे, असा मनाशी निश्चय करून प्राध्यापक वेदकुमार वेदालंकार (Professor Vedkumar Vedalankar) यांनी अनेक पुस्तके हिंदी भाषेत नेली. तुकारामाच्या 500 अभंगांचा पद्यानुवाद करणाऱ्या प्रा. वेदालंकारांनी मराठीतील अनेक गाजलेल्या मराठी पुस्तकांचा अनुवाद केला. त्यामध्ये ‘छावा’, ‘पाचोळा’ सारख्या कादंबऱ्या, महात्मा जोतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘गुलामी’ या पुस्तकांचा समावेश आहे. मितभाषी वेदकुमार वेदालंकार यांचे प्राथमिक शिक्षण हरयाणामधील कुरुक्षेत्रमध्ये झाले. पुढं गुरुकुल कांगडीमधून त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. उस्मानिया विद्यापीठातून हिंदीमधून MA पर्यंतचे शिक्षण मिळविले. नंतर अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले. सध्या ज्ञानेश्वरी आता हिंदी भाषेत (Hindi languages) अनुवादित होत आहे.

मराठीतील ठेवा इतर भाषेतही उपलब्ध व्हावा यामुळे प्राध्यापक वेदकुमार वेदालंकार (Professor Vedkumar Vedalankar) यांनी ज्ञानेश्वरीचा अनुवाद करण्याचे ठरविले आहे.
तसेच 4 हजार ओवींचा अनुवाद पूर्ण झाला आहे. गणेशाच्या वर्णनाने सुरू होणाऱ्या ज्ञानेश्वरीचे (Dnyaneshwari) पहिले 3-4 अध्याय तसे लहान आहेत.
परंतु, त्याचा अनुवाद करताना त्याचे भाव जगणे अधिक उन्नत करत होते.
आता ओवी अनुभवता येणे ही प्रक्रिया असली, तरी भाषिक अर्थाने ती इतर भाषकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्याचा अनुवाद करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रा. वेदालंकार सांगतात.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य म्हणून निवृत्तीनंतर भाषा अनुवादाच्या क्षेत्रात प्रा. वेदालंकार (Professor Vedkumar Vedalankar) यांनी मोठे योगदान दिले आहे.

संत गोरा कुंभार, संत चोखामेळा अशा 9 संतांच्या 650 अभंगांचा अनुवाद केला आहे.
चोहा, चौपाई, गीत आदी छंदात अनुवाद त्यांनी केला आहे. राज्य सरकारच्या वतीने हिंदी साहित्य अकादमीच्या वतीने गजानन माधव मुक्तिबोध पुरस्कार (Gajanan Madhav Muktibodh Award) त्यांना मिळालेला आहे.
पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अनुवादाच्या पुरस्कारा बरोबर अनेक पुरस्कारही त्यांनी मिळवले आहेत.
तसेच, नवनव्या पुस्तकाचे वाचन करताना मराठी संत साहित्य हिंदीत घेऊन जाण्याचे त्याचे कार्य मौलिक मानले जाते. आता ज्ञानेश्वरी देखील हिंदी भाषकांपर्यंत पोहचणार आहे.
‘ऐसे अक्षरे मिळविन की अमृताशी पैजा जिंके’ असा मराठी भाषेचा मान उंचावणाऱ्या संत ज्ञानेश्वराचा आद्यग्रंथ आता हिंदीमध्ये (Hindi languages) अनुवादित होणार आहे.

दरम्यान, प्रा. वेदकुमार वेदालंकार (Professor Vedkumar Vedalankar) सांगतात की,
‘एरवी अन्य लेखकांच्या साहित्याचा अनुवाद करताना फारसे शब्द अडायचे असे कधी घडायचे नाही.
पण ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) मुळात चिंतनाचा भाग आहे. म्हणून तसा हा अनुवाद अवघड आहे पण जमून येतो आहे.
आतापर्यंत चाळीस पुस्तके प्रकाशित झाल्यानंतरही हे अनुवादाचे काम करताना नवा आनंद मिळतो आहे.
असं त्यांनी म्हटलं आहे.

Web Title : Professor Vedkumar Vedalankar | aurangabad news dnyaneshwari epitome marathi saraswat hindi

Pune Crime | आयुर्वेदिक ऑईलच्या व्यवसायाचे आमिष दाखवून सव्वा कोटींना घातला गंडा

Pune Police | पुण्यातील पोलिस निरीक्षकानं इंटेरिअर डेकोरेटरच्या कानाखाली पिस्तुल लावल्यानं प्रचंड खळबळ; समर्थ पोलिस ठाण्यात ‘नोंद’

Home Remedies for Dry Lips | ‘हे’ घरगुती उपाय करून घ्या ओठांची काळजी, जाणून घ्या