राज्यातील 13 पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त/ उपविभागीय अधिकारी पदी बढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य गृह विभागाने सन 2017 च्या दाखल असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणातील निर्णय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता घेऊन 13 पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त/ पोलिस उपविभागीय अधिकारी या पदावर पदोन्नती केली आहे. बढती देण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात त्यांची सध्याची नियुक्ती आणि बढतीनंतरचे नियुक्तीचे ठिकाण पुढील प्रमाणे.

संजय लक्ष्मण पवार (पोलिस निरीक्षक, पुणे शहर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, पुणे शहर)

इंद्रजित वसंत काटकर (पोलिस निरीक्षक, रायगड ते उपविभागीय पोलिस अधिकारी, शाहुवाडी उपविभाग, कोल्हापुर)

मधुकर सखाराम गावित (पोलिस निरीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक ते सहाय्यक आयुक्त, नाशिक शहर)

हेमंत मोतिराम मानकर (पोलिस निरीक्षक बीड ते उपविभागीय पोलिस अधिकारी, कन्नड उपविभाग, औरंगाबाद)

श्रीमती मीरा तातोबा बनसोडे (पोलिस निरीक्षक, नवी मुंबई ते सहाय्यक आयुक्त, नवी मुंबई)

विजयालक्ष्मी शिवशंकर होतेगौडा (हिरेमठ विजयालक्ष्मी विद्यारान्या) (पोलिस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, नागपूर शहर)

संभाजी सुदाम सावंत (पोलिस निरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, तुरची, तासगांव, सांगली ते उपविभागीय पोलिस अधिकारी, अक्कलकुआ उपविभाग, नंदूरबार)

जयप्रकाश मधुकर भोसले (पोलिस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई)

शैलेश प्रभाकर जाधव (पोलिस निरीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक ते वाचक पोलिस उप अधीक्षक, विशेष पोलिस महिनिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र)

मुकुंद गोपाळ पवार (पोलिस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग ते सहाय्यक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई)

राजु धोंडीराम मोरे (पोलिस निरीक्षक, पुणे शहर ते उपविभागीय अधिकारी, परतूर उपविभाग, जालना)

भरत शेका गायकवाड (पोलिस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, अमरावती शहर)

सुशिल प्रभू कांबळे (पोलिस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक आयुक्त, बृहन्मुंबई)