ढेकणांच्या समस्येनं त्रस्त आहात ? एकदा ‘हे’ घरगुती उपाय करून पहा

पोलीसनामा ऑनलाईन – अनेकजण घरात ढेकणांच्या समस्येनं त्रस्त असतात. घरात ढेकणं असतील तर रात्री त्यांच्या चावण्यामुळं झोपणंही मुश्किल होतं. आज आपण ढेकणं घालवण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) ढेकणांचा नायनाट करण्यासाठी कांद्याचा रस हे अत्यंत फायदेशीर औषध आहे. कांद्याच्या रसाचा वास ढेकणांना सहन होत नाही. त्यामुळं त्यांना श्वास घेण्यात अडथळा येतो आणि ते मरतात. त्यामुळं ढेकूण होत असलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावावा.

2) गादी, पांघरून किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी ढेकून आढळल्यास त्या ठिकाणी निलगिरीचे थेंब शिंपडा.

3) निलगिरीच्या तेलात रोजमेरी, लव्हेंडर तेल मिक्स करून हे तेलदेखील ढेकणांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी लावू शकता.

4) लव्हेंडरची पानं कपड्यांवर घासल्यास कपड्यांवरील ढेकूण निघून जातात.

5) पुदीन्यांच्या पानांच्या तीव्र वासामुळंही ढेकूण दूर होतात. त्यामुळं रात्री झोपण्यापूर्वी अंथरूणाशेजारी ताज्या पुदीन्याची पानं ठेवावीत.

6) कडुलिंबामध्ये अँटी मायक्रोबायल गुणधर्ण असतात. त्यामुळं कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकवेळा कडुलिंबाच्या पानांचा वापर होतो. जर घरात ढेकूण झाले असतील तर कडुलिंबाच्या तेलाचा शिडकाव घरातील कोपरे, अंथरूण यावर करावा.

7) घरात स्वच्छता ठेवा. घरातील ओलसरपणा टाळा.

8) घरात पुरेपूर सुर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या.

9) वेळोवेळी पेस्ट कंट्रोल करा.

ढेकूण होण्याची कारणं –

1) कुजलेले लाकूड किंवा ओलसर जागा येथे ढेकणांची पैदास लवकर होते.

2) घरात अस्वच्छता असेल तर तिथे लगेच ढेकणं होतात.

3) घरात पुरेसा सुर्यप्रकाश येत नसेल तर ढेकणं लगेच तिथं राहतात.

4) सुर्यप्रकाश नसलेल्या जागी ढेकूण वर्षानुवर्षे राहतो. तसंच तो 65 दिवस अन्नाशिवाय जगू शकतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.