PSI Abhijeet Sawant | पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह..

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PSI Abhijeet Sawant | पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अमलदार यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात येते. हा बहुमान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांना मिळाला असून यांना पोलिस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे हे सन्मान चिन्ह त्यांना 1 मे महाराष्ट्रदिनी प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.(PSI Abhijeet Sawant)

गुन्हेगारांविरुद्ध केलेल्या कारवाईसाठी आणि खळबळजनक तसेच गंभीर गुन्ह्यांचा यशास्वीपणे तपास केल्याबद्दल त्यांना “DG INSIGNIA” पदक जाहीर केले आहे. हे सन्मानचिन्ह प्रवर्ग ३ मध्ये जाहीर करण्यात आले आहे या प्रवर्गासाठी फार कमी अधिकारी व अंमलदार यांची निवड होत असते असे पोलीस खात्यातील जाणकाराचे मत आहे. अभिजीत सावंत सध्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असून ते 2015 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर पोलिस खात्यामध्ये भरती झाले. आत्तापर्यंत त्यांची पोलिस खात्यात 9 वर्ष सेवा पूर्ण झाली आहे. इतक्या कमी कालावधी मध्ये त्यांनी सांगली व पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे म्हणून त्यांना उत्कृष्ठ सेवेसाठी 150 बक्षिसे देखील मिळाली आहेत.

महाराष्ट्र शासन,गृह विभाग शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम
कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय, प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक, पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक
प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह सन्मानचिन्ह प्रदान करण्याकरीता दिलेल्या मंजूरीनूसार सन-२०२३
या वर्षाकरीता पोलीस विभागात उत्तम उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अमलदार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात येते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Cop In Pune | पुणे : दुचाकीस्वाराकडून पोलिसाला शिवीगाळ करुन खुर्चीने मारहाण

Congress Vs BJP | पक्ष, नेते फोडण्यापाठोपाठ आता उमेदवार पळविण्याचा भाजपाचा ‘खेळ’, सूरतनंतर एमपीत काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती