Pune : ‘रेड लाईट’ एरियातील महिलांच्या अनुदानाचा अपहार करणार्‍यांकडून 46 लाख जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी आलेल्या निधीचा अपहार प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींच्या घरातून ४६ लाख ६१ हजार रूपये पोलिसांनी जप्त केली आहेत. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत २१ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

गौरी तेजबहाद्दूर गुरूंग (वय ३२, मनाली अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) सविता अशोक लष्करे (वय २६ ), सारिका अशोक लष्करे (वय ३०, दोघी रा. यशवंतनगर, येरवडा ), अमोल दत्तात्रय माळी (वय २५, धनकवडी ) आणि महेश राजू घडसिंग (वय २६, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, गणेशखिंड रोड ) असे अटक आरोपींचे नावे आहेत. त्यांच्यासह एका शासकि अधिका-‍याविरोधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीत पर्वती, लक्ष्मीनगर परिसरात हा गुन्हा घडला.

शासनाकडून लाभार्थी महिलांना देण्यासाठी ११ कोटी रूपयांचे अनुदान मिळालेले असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यानुसार रेडलाईट एरियामधील महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करून त्यातीलही रक्कम आरोपींनी घेतली असण्याची दाट शक्यता आहे. अशा महिलांकडे तपास करायचा आहे. या आरोपींना कोणी कोणी मदत केली आहे याचा तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, असा युक्तिवाद सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.

दरम्यान पोलिसांकडून कायाकल्प संस्थेच्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन संगणक, एक लॅपटॉपमधील हार्डडिक्स, पेनड्राईव्ह, ईमेल वरील माहिती तसेच देहविक्री करणा-‍या महिलांची तसेच न करणा-‍या महिलांची संमतीपत्रे, बँक पासबुक तसेच संबंधित कागदपत्रे असलेल्या सात बॉक्स फाईल्स आदी जप्त करण्यात आल्या आहेत.

जप्त डेटाचे होणार विश्‍लेषण :

कायाकल्प संस्थेच्या संगणकातून जप्त केलेल्या हार्डडिस्क, ईमेल डाटा, महिलांच्या माहितीची फाईल्स आदीचे विश्लेषण करणे, तसेच गुन्ह्यातील आरोपींनी घेतलेली रक्कम जप्त करायची आहे. अटक केलेल्या आरोपींनी लक्ष्मीनगर, पर्वती भागातील महिलांकडून पैसे जमा केले आहेत