Pune ACB Trap | लाच घेताना पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या महिला प्राध्यापीका अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | पीएचडी डिग्रीसाठी (PhD Degree) तयार केलेले प्रबंध रिजेक्ट करण्यासाठी व सुधारणा करुन पुन्हा सादर करणे व त्यावर अप्रुव्हल देण्यासाठी 20 हजार रुपये लाच स्वीकारताना पुणे विद्यापीठातील Savitribai Phule Pune University (SPPU) अर्थशास्त्राच्या प्राध्यापीका डॉ. शकुंतला निवृत्ती माने Dr. Shakuntala Nivrutti Mane (वय-59) यांना पुणे एसीबीने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एसीबीने ही कारवाई शनिवारी (दि, 30) सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील (Baburaoji Gholap College) अर्थशास्त्र विभाग (Department of Economics) प्रमुख्याच्या कार्य़ालयात केली.(Pune ACB Trap)

याबाबत 40 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे प्राध्यापक असून त्यांनी अर्थशास्त्र मध्ये Ph.D. डिग्री प्राप्त करुन घेण्यासाठी ऑनलाईन प्रबंध सावित्रीबाई फुले विद्यापीठ करीता तयार केला आहे. हा प्रबंध विद्यापीठाकडे सादर करण्यासाठी तक्रारदार यांचे मार्गदर्शक म्हणून प्राध्यापिका डॉ. शकुंतला माने यांची विद्यापीठाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी सादर केलेला प्रबंध रिजेक्ट करण्यासाठी व सुधारणा करुन पुन्हा सदार करणे व त्यावर अप्रुव्हल देण्यासाठी माने यांनी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली. (Pune Bribe Case)

प्राप्त तक्रारीची 26 मार्च रोजी पडताळणी करण्यात आली.
त्यावेळी शकुंतला माने यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार शनिवारी सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडे मागितलेल्या 25 हजार रुपयांपैकी 20 हजार रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारताना माने
यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Amol Tambe SP), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Sheetal Janve)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबी पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर (Sudam Pachorkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leopard Near Pune Hinjewadi IT Park | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात आढळला बिबट्याचा नवजात बछडा, वनविभागाने ताब्यात घेऊन त्याला… (Video)

Pune Hadapsar News | ‘राईड टू सेफ्टी’ प्रकल्पांतर्गत पोलीस व त्यांच्या पाल्यांना हेल्मेटचे वाटप