Leopard Near Pune Hinjewadi IT Park | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात आढळला बिबट्याचा नवजात बछडा, वनविभागाने ताब्यात घेऊन त्याला… (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Leopard Sighted In Pune Hinjewadi IT Park | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील एका शेतात बिबट्याचा नर जातीचा एक बछडा ऊसतोडणी सुरू असताना शेतकऱ्यांना आढळून आला. यानंतर वनविभागाला ही माहिती तातडीने दिल्यानंतर या बछड्याला वनविभाग आणि ॲनिमल रेस्क्यू टीमने ताब्यात घेतले.

आता ज्या ठिकाणी तो सापडला त्याच ठिकाणी त्याला ठेवण्यात आले असून मादी बिबट्या घेऊन जाण्याची वाट पाहिली जात आहे. यासाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, या परिसरात बिबट्याचा वावर आहे.

बिबट्याचा बछडा सापडल्याच्या वृत्तानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. नेरे (ता. मुळशी) येथील राहुल जाधव यांच्या ऊसाच्या फडात शनिवारी हा नर जातीचा नवजात बछडा आढळला. ऊसतोड मजुराला हा बछडा दिसताच वनविभाला माहिती देण्यात आली.

यानंतर पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल प्रज्ञा बनसोडे, आयटी पार्क हिंजवडीचे वनरक्षक पांडुरंग कोपनर,
ॲनिमल रेस्क्यू टीम, वाईल्ड ॲनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन, वन्यजीव रक्षक संघटेनेचे स्वयंसेवक नेरे येथे आले.

बिबट्याच्या सापडलेल्या नवजात बछड्याला मातेची गरज असल्याने बछडा ज्या ठिकाणी सापडला त्याच ठिकाणी
सायंकाळी त्याला सोडण्यात आले आणि कॅमेरे लावून त्यांची निरीक्षणे नोंदविली जात आहेत.

दरम्यान, पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी म्हटले की, शेतकऱ्यांनी घाबरू नये.
जोपर्यंत मादी बछड्याला घेऊन जात नाही तोपर्यंत दोन-तीन दिवस ऊसतोड बंद ठेवावी.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pandav Nagar Crime | जुन्या वादातून मित्रावर कोयत्याने वार, पांडवनगर परिसरातील घटना

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | शार्प यू-टर्न! शिवतारे म्हणाले, सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू