Pune Sahakar Nagar Crime | ब्रेकअप झाल्याच्या रागातून तरुणीचा अश्लिल व्हिडिओ केला व्हायरल, सहकारनगर पोलिसांनी गोव्यातून आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sahakar Nagar Crime | मुलीला अश्लील व्हिडीओ करण्यास भाग पाडून तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करुन घेतला. त्यानंतर ब्रेकअप केल्याचा राग मनात धरुन पीडित तरुणीचा व्हिडीओ फेक इन्स्टाग्राम आयडी बनवून तसेच युट्युबवर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पीडित मुलीने 18 जानेवारी रोजी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्यातील आरोपीला गोवा राज्यातून अटक करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे.

विनय मारुती शेकापुरे (वय-23 सध्या रा. गणेश कृपा, नालंदा कॉलनी, मिरमार, पणजी, गोवा मुळ रा. मु.पो. मुखेड, ता. मुखेड, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला याची कोणतीच माहित पोलिसांकडे नव्हती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता संशयित आरोपी गोवा राज्यातील पणजी येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये नोकरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, कोणत्या हॉटेलमध्ये काम करतो याची माहिती मिळाली नाही.

आरोपीचा शोध घेण्यासाठी सहकारनगर पोलीस ठाण्यातील (Sahakar Nagar Police Station) एक पथक गोवा येथे रवाना करण्यात आले. पोलिसांनी पणजी येथील वेगवेगळ्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये चार दिवस आरोपीचा शोध घेतला. अखेर तो काम करत असलेल्या हॉटेलची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सोमवारी (दि.29) हॉटेलच्या बाहेर सापळा रचून तो हॉटेल मधून बाहेर आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिणी वग्यांनी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहायक पोलीस फौजदार सोपान नावडकर, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतारे, सागर सुतकर, निखील राजीवडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Pune Pimpri Chinchwad Crime News | नियम बाह्य वाहनांची डीलरशिप देऊन व्यावसायिकाची 29 लाखांची फसवणूक, चिंचवड परिसरातील प्रकार
Marathi Actor Ashok Saraf | अशोक सराफ यांना कलाक्षेत्रातील महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन