Pune Accident News | पुणे-सातारा महामार्गावर गॅस टँकर उलटला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | पुणे-सातारा महामार्गावर (Pune-Satara Highway) कापूरहोळ जवळ घरगुती वापराचा गॅस वाहतूक करणारा टँकर (Gas Tanker) उलटला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तीन क्रेनच्या मदतीने हा अवजड टँकर बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात असताना साखळी तुटली. गँस गळती होऊन दुर्घटना घडू नये यासाठी टँकर बाजूला घेण्याचे काम सध्या सुरू आहे. (Pune Accident News)

पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ जवळ हरिश्चंद्री (ता भोर) या ठिकाणी साताऱ्याच्या दिशेने हा टँकर (एमएच 31 एफसी 4022) बुधवारी (दि.27) रात्रीच्या सुमारास जात होता. त्यावेळी टँकर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर उलटला. टँकरमध्ये जवळपास 32 टन गॅस असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई (चेंबूर) येथून भारत कंपनीचा गॅस (India Gas Company) घेऊन
साताराच्या दिशेने महामार्गावरुन वाईकडे जात होता. दरम्यान, कार चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर चालक
अब्दुल वाजिद याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर महामार्ग रस्ता सोडून सेवा रस्त्यावर लांबपर्यंत घासत गेला.
टँकरमध्ये गॅस असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. (Pune Accident News)

घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस (Highway Police), किकवी दूरक्षेत्राचे पोलीस, भारत गॅसचे अधिकारी,
भोर नगरपालिकेचे अग्नीशमन दल (Fire Brigade), दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
सध्या चार क्रेनच्या सहाय्याने टँकरला बाजूला घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | छगन भुजबळ शरद पवारांना जेलमधून ब्लॅकमेल करायचे, माजी आमदार रमेश कदमांचा खळबळजनक गौप्यस्फोट