Pune Accident News | पुणे : मकरसंक्रांतीसाठी गावी निघालेल्या मायलेकरांचा अपघात, डंपरच्या चाकाखाली आल्याने आईचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मकरसंक्रांतीसाठी गावी निघालेल्या मायलेकरांची दुचाकी रस्त्यावर पडलेल्या खडीवरून घसरली. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या डंपरचे चाक आईच्या डोक्यावरुन गेले. यामध्ये गंभीर जखमी होऊन आईचा मृत्यू झाला. हा अपघात (Pune Accident News) सोमवारी (दि.15) सकाळी नऊच्या सुमारास कापूरहोळ-भोर मार्गावरील (Kapurhol-Bhor Road) नेकलेस पॉईंटच्या उतारावरील संगमनेर गावाच्या हद्दीत झाला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

लताबाई गोपाळ येलमकर (वय-65 रा. उंदेरी ता. महाड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मुलगा अविनाश गोपाळ येलमकर (वय-39 सध्या रा. खडकवासला, मुळ रा. उंदेरी ता. महाड जि. रायगड) हा थोडक्यात बचवला असून तो जखमी झाला आहे. या घटनेनंतर डंपर चालक व कामगार फरारा झाले. कापूरहोळ-भोर-मांढरदेवी या मार्गाच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे व विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची खडी रस्त्यावर पडल्याने हा अपघात झाला.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश येलमकर हे कुटुंबासह खडकवसाला येथे कामानिमित्त राहात आहेत. मकरसंक्रांत सणासाठी ते मूळ गावी महाड तालुक्यातील उंदेरी येथे आईला घेऊन दुचाकीवरुन जात होते. सकाळी नऊच्या सुमारास नेकलेस पॉईटच्या उतारावर त्यांची गाडी रस्त्यावर पडलेल्या खडीवरुन घसरली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. त्यावेळी समोरुन रस्त्याच्या कामावर असलेला डंपर येत होता. चढ असतानाही डंपर वेगात येत होता. डंपरचे चाक लताबाई यांच्या डोक्यावरुन गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच किकवी दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी लताबाईंना तपासून मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक, एकाला अटक