Pune Accident News | भरधाव बसची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू तर दोन पादचारी जखमी; कात्रज परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या बसची धडक एका दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीस्वारासह सहप्रवाशाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर बसच्या धडकेत दोन पादचारी जखमी झाले. हा अपघात (Pune Accident News) कात्रज परिसरातील खोपडेनगर परिसरातील डोंगराच्या उतारावर सोमवारी (दि.15) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास झाला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

गणेश चोकला (रा. हडपसर) आणि गिरधारीलाल जाट (वय-36) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर अर्जुन जुजाराम देवाशी (वय-23 रा. नेहरुनगर, पिंपरी) व प्रवीण प्रजापती (वय-23) हे दोन पादचारी बसच्या धडकेत जखमी झाले आहे. याबाबत अर्जुन देवाशी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन बस चालक किरण रविंद्र महादे (वय-29 रा. खडकवासला) याच्यावर आयपीसी 279, 304अ, 337, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास दुचाकीस्वार गणेश आणि सहप्रवासी गिरीधारीलाल कात्रज भागातील खोपडेनगर परिसरातून निघाले होते.
वृंदावन गो शाळेजवळ डोंगराच्या उतारावर बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
त्यामुळे बसची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश आणि गिरीधारीलाल गंभीर जखमी झाले.
तेथून निघालेले पादचारी फिर्यादी व प्रवीण यांना बसचा धक्का लागल्याने ते जखमी झाले.
जखमी झालेल्या गणेश आणि गिरीधारीलाल यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अमावस्या, पोर्णिमेला देवाला अंडी, सिगारेट, दारुचा नैवैद्य; मुलासाठी सुनेचा छळ, जादुटोणा कायद्याखाली पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

‘तू दादा झालास का’ म्हणत बिअरच्या बाटल्यांनी मारहाण, एकाला अटक; कर्वेनगर येथील घटना

इंन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेक्कन परिसरातील घटना

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 23 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे शहर वंचित बहुजन आघाडी कार्यकारी अध्यक्षावर स्टेशन परीसरात हल्ला